अभिनेत्री कल्की कोचलीन लग्नाआधीच बाळंतीण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 February 2020
  • शुक्रवारी संध्याकाळी कल्की कोचलीन हि बाळंतीण झाली असून आई आणि बाळ हे दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हाय हर्शबर्ग ह्या आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होती
  • त्यामुळे ह्या दोघांच्या नात्याविषयी उलटसुलट चर्चा देखील रंगायची मात्र या सर्व चर्चेला कल्की कोचलीन आणि हाय हर्शबर्ग ह्या दोघांनी फाटा देत एका गोंडस बाळाला जन्म दिला.

मुंबई :आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार कल्की कोचलीन हि सध्या भलत्याच अशा कारणावरून चर्चेत आहे.लग्नाधीच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे त्यामुळे सिनेवर्तुळात तिच्या नावाची प्रचंड चर्चा आहे.

शुक्रवारी संध्याकाळी कल्की कोचलीन हि बाळंतीण झाली असून आई आणि बाळ हे दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हाय हर्शबर्ग ह्या आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये होती त्यामुळे ह्या दोघांच्या नात्याविषयी उलटसुलट चर्चा देखील रंगायची मात्र या सर्व चर्चेला कल्की कोचलीन आणि हाय हर्शबर्ग ह्या दोघांनी फाटा देत एका गोंडस बाळाला जन्म दिला.

ह्यावर प्रसारमाध्यमांनी कल्कीला विचारले असता माझे आणि माझ्या प्रियकराचे कुटुंब हे आधुनिक विचारसरणीला अनुसरून  भूमिका मांडते त्यामुळे मी आणि हाय हर्शबर्गनी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधानी आहोत अशा आशयाचे  मत मांडले. कल्की या आधी अनुराग कश्यप सोबत दीर्घकाळ रिलेशनशिप मध्ये होती त्यानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

मात्र काही कारणामुळे या दोघांचा संसार काही जास्त काळ टिकू शकला नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांचा घटस्फोट २०१५ मध्ये पार पडला. त्यानंतर कल्की ने हाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News