कढाई पनीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020
  • पनीर हा सर्व शाकाहारी खवय्यांचा आवडता पदार्थ आहे.
  • तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता कढाई पनीरची रेसिपी घेऊन आली आहे. 

पनीर हा सर्व शाकाहारी खवय्यांचा आवडता पदार्थ आहे. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता कढाई पनीरची रेसिपी घेऊन आली आहे. 

 

साहित्य :- 

•  ३०० ग्रॅम पनीर
•  १ मोठी सिमला मिरची
•  १ मोठा कांदा
•  २ मध्यम टमॅटो
•  १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
•  १ मोठा चमचा धने
•  ३ किंवा ४ लाल मिरच्या (आकाराप्रमाणे)
•  १ चमचा गरम मसाला
•  २ चमचे तेल
•  कसुरी मेथी
•  चवीला मिठ

पाककृती :- 

पनीर स्वच्छ धुवून त्याचे लहान चौकोनी तुकडे करून घ्यावेत. कढाई पनीर बनवण्यासाठी सिमला मिरची उभी चिरून घ्यावी तसेच कांदा आणि टोमॅटो बारिक चिरून घ्यावेत. धने आणि लाल मिरच्या हे कोरडे मसाले एकत्र करून मिक्सरवर कोरडं बारीक करून घ्यावं. कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाई पर्यंत परतून घ्या. मग टोमॅटो घालून दोन मिनिटे परतून  मग त्यावर कोरडा कढाई मसाला घालावा. हे सगळं मिश्रण गोळा होऊन त्यातून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. त्यात सिमला मिरची घालून दोन मिनिटे पुन्हा परतावं.

आता यात अंदाजे पाणी घालून सिमला मिरची अर्धवट शिजू द्यावी आणि नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून वरून गरम मसाला घालावा. भाजीत चवीप्रमाणे मिठ घालून नीट ढवळून घ्यावं आणि मग १० मिनीटे शिजू द्यावी. कसुरी मेथी चुरून भाजीत घालावी आणि मग गॅस बंद करावा. भाजी खायला घेताना वरून लिंबू पिळून घ्यावं त्याने भाजीची चव अधिक चांगली लागते. अश्याप्रकारे आपली कढाई पनीरची रेसिपी तयार आहे. कढई पनीरची भाजी फुलका, पराठा किंवा चपातीसोबत खूप छान लागते.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News