कबीर खानची नवी वेबसीरिज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

आता वेबसीरिजच्या माध्यमातून ही कथा कबीर प्रेक्षकांसमोर आणत आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या ‘द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए’ ही वेबसीरिज कबीरने दिग्दर्शित केली आहे. याबाबत तो म्हणतो, ‘अशी देशभक्तिपर कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचं माझं स्वप्न होतं. ते माझं स्वप्न आता पूर्ण होत आहे.

दर्जेदार कथा रुपेरी पडद्यावर आणण्यात दिग्दर्शक कबीर खानचा हातखंडा आहे. डॉक्‍युमेंट्रीपासून कबीरने त्याच्या करिअरला सुरुवात केली. ब्रिटिशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ही देशभक्तिपर कथा प्रेक्षकांच्या समोर आणण्याचं कबीरच स्वप्न होतं.

बऱ्याच वर्षांपूर्वी त्याने ही कथा लिहून ठेवली होती. आता वेबसीरिजच्या माध्यमातून ही कथा कबीर प्रेक्षकांसमोर आणत आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओच्या ‘द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए’ ही वेबसीरिज कबीरने दिग्दर्शित केली आहे. याबाबत तो म्हणतो, ‘अशी देशभक्तिपर कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचं माझं स्वप्न होतं.

ते माझं स्वप्न आता पूर्ण होत आहे.’ या वेबसीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. सन्नी कौशल, शर्वरी, टीजे भानू यांसारखे नव्या पिढीचे कलाकार या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News