कबड्डीपट्टू राजू कथोरेंचा महाराष्ट्र शासनाकडून गौरव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

वासिंद : वासिंद गावातील गुणवंत कबड्डीपटू राजू कथोरे याला राज्य सरकारतर्फे शनिवारी  गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे कबड्डी खेळातील विशेष नैपुण्याबद्दल सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये आसाम येथे कबड्डी स्पर्धेत अंतिम उपविजेत्या ठरलेल्या राज्य संघातील रजत पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या संघात राजू कथोरेने चमकदार खेळ केला होता. वासिंदच्या जयबजरंग कबड्डी संघातून तयार झालेल्या या खेळाडूने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांआतील व १९ वर्षांआतील कबड्डी संघाचे कर्णधारपद त्याने भूषविले असून सध्या तो २१ वर्षीय राज्य संघातून खेळत आहे. त्याला कबड्डी प्रशिक्षक पुंडलिक गोरले याचे मार्गदर्शन लाभले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News