ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपावर पलटवार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असणारे मात्र मध्यप्रदेश राज्याचे एकेकाळी मुख्यमंत्री पद भूषवणारे माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य माधवराव शिंदे हे सध्या वेगळ्याच कारणावरून प्रकाशझोतात आले आहेत.सध्या मध्य प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या या व्यक्तीने स्वतःच्या पक्षाची बाजू ही चांगलीच लावून धरली आहे.

त्यामागचे कारण म्हणजे सध्या मध्य प्रदेश मध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडी. मध्य प्रदेशमध्ये सध्या सत्तांतराच्या चर्चेला ऊत आला आहे.सध्या काँग्रेस पक्षाचे असलेले सरकार हे वेळोवेळी अस्थिर असल्याची चर्चा सर्वत्र पसरत आहे.

त्यामुळे मध्यप्रदेश राज्यात ऑपरेशन कमळ अस्तित्वात येणार अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षाचे आणि मित्र पक्षाचे प्रत्येकी ४-४ आमदार हे गुरुग्राम मधील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये आढळून आल्याने एकच खळबड  उडाली होती याबाबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित करताच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने मात्र या वृत्तास फेटाळून लावले.

तसेच ज्योतिरादित्य माधवराव शिंदे याना प्रसारमाध्यमांनी या फोडाफोडीच्या चर्चेबाबाबत विचारले असता त्यांनी यावर अतिशय शेलक्या शब्दात टिप्पणी केली.“ही भाजपाची जुनी सवय आहे, पण ते यामध्ये यशस्वी होणार नाही, आम्ही सर्वजण सोबत आहोत. मध्य प्रदेश सरकारला कोणताही धोका नाही. ” असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी एएनआयशी या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News