जॉनची नवी भूमिका नवा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

आता लवकरच तो ‘मुंबई सागा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये तो कुर्ता-पायजमामध्ये एका खुर्चीवर बसला असून त्याच्या कपाळावर तिलक लावल्याचे दिसत आहे.

अभिनेता जॉन अब्राहमचे ‘सत्यमेव जयते’, ‘मद्रास कॅफे’, ‘शूट आऊट ॲट वडाल’सारखे अनेक चित्रपट गाजले. त्याचा नुकताच ‘पागलपंती’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता लवकरच तो ‘मुंबई सागा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

नुकताच त्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये तो कुर्ता-पायजमामध्ये एका खुर्चीवर बसला असून त्याच्या कपाळावर तिलक लावल्याचे दिसत आहे. जॉन या लूकमधून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.

या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता इमरान हाशमी, जॅकी श्रॉफ, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर हे कलाकार झळकणार आहे. जॉनचा हा लूक पाहून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News