जॉनचा 'रॉ' लवकरच प्रदर्शित

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Wednesday, 6 March 2019

बॉलीवूडमध्ये बायोपिक आणि देशभक्तिवर आधारित चित्रपटांची चलती आहे. त्यातच आता आणखी एका देशभक्तिपर चित्रपटाची भर पडली आहे. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ म्हणजेच ‘रॉ’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये जॉन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. देशभक्तीवर आधारित हा चित्रपट आहे. १९७१ सालच्या युद्धात घडलेल्या एका सत्य घटनेचे दर्शन प्रेक्षकांना या चित्रपटामधून घडणार आहे. जॉनने ‘रॉ’मध्ये एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.

तो म्हणतो, ‘मी या चित्रपटात आठ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. २६ वर्षांच्या तरुणापासून ते ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंतचे माझे वेगवेगळे लूक यात पाहायला मिळतील.’ जॉनचा हा आगाळावेगळा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरतो का, हे पाहायचंय. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News