जॉन सीना चक्क बिगबॉसच्या मोहात ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • आत्तापर्यंत जॉन सीनाने प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी,अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सुशांतसिंग राजपूत, रणवीर सिंग या लोकांचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत
  • मात्र नुकताच त्याने बिग बॉस फेम "असीम रिआज" चा फोटो हा आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.

मुंबई : डब्लू डब्लू इ सुपरस्टार जॉन सीना हा नेहमीच त्याच्यामध्ये असलेल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. तो सतत सोशल मीडियावर देखील काही ना काही पोस्ट करत असतो. जॉन सीना इंस्टाग्रामवर तर प्रचंड प्रमाणावर सक्रिय असताना आपल्याला दिसते.

त्याच्या सोशल मीडियावर उपलोड केलेल्या पोस्ट देखील बऱ्याच इंटरेस्टिंग पण कोड्यात पाडणाऱ्या असतात.जॉन सीना हा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर समाजातील नामांकित असे व्यक्तिमत्व असलेल्या लोकांचे फोटो पोस्ट करत असतो मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे कॅप्शन देत नाही.त्यामुळे त्याच्या पोस्टचा अर्थ समजून घेण्यामध्ये त्याच्या चाहत्यांची चांगलीच दमछाक होते.

आत्तापर्यंत जॉन सीनाने प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी,अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सुशांतसिंग राजपूत, रणवीर सिंग या लोकांचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.मात्र नुकताच त्याने बिग बॉस फेम "असीम रिआज" चा फोटो हा आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे.

त्यामुळे जॉन सीना  हा चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.जॉन सीना सारखा बलाढ्य असा रेसलर हा भारतीय टीव्ही विश्वातील रियालिटी शो असलेल्या बिग बॉसची दखल घेतो हे मात्र नक्की. त्यामुळे जॉन सीनाला आता चक्क बिग बॉसची भुरळ पडली कि काय अशी चर्चा रंगू लागली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News