SBI मध्ये विनापरीक्षा मिळतेय नोकरी, तुम्ही अर्ज केला का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

अर्ज करणा-या उमेदवाराकडे पदवी असणं अनिवार्य आहे. सामान्य आणि ओबीसीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडून ७५० शुल्क आकारले जाईल. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर केवळ मुलाखत घेतल्यानंतर नोकरी मिळणार आहे.

SBI मध्ये विनापरीक्षा मिळतेय नोकरी, तुम्ही अर्ज केला का ?

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या सुटल्या आहेत, त्यातच भारतीय स्टेट बॅंकेने अनेक पदांवर भरती सुरू केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेतील भरतीची जाहिरात सुध्दा प्रसिध्द झाली आहे. नोकरी हवी असलेल्या उमेदवारांनी आजचं अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज दाखल करावा. उद्या अर्ज करायची शेवटची तारीख आहे.

भरतीची शेवटची तारिख १६ ऑगस्ट असून ३८५० जागा देशभरातील विविध ब्रॅंच मध्ये भरण्यात येणार आहे. गोवा - ३३, महाराष्ट्र - ५१७, राजस्थान - ३००, तेलंगाना - ५५०, तामिळनाडू ५५०, कर्नाटक -७५०, गुजरात - ७५०, मध्यप्रदेश - २९० छत्तीसगड - १०४ अशी पदं भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. तिथे भरती संदर्भात संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जुलैला सुरू झाली असून ही १६ ऑगस्टपर्यंत असणार आहे. उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2020 रोजी 30 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणमध्ये बसणा-या उमेदवारांना १५ वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

अर्ज करणा-या उमेदवाराकडे पदवी असणं अनिवार्य आहे. सामान्य आणि ओबीसीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडून ७५० शुल्क आकारले जाईल. गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर केवळ मुलाखत घेतल्यानंतर नोकरी मिळणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News