संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

प्रत्येकी सुमारे चार लाख रुपये वार्षिक पॅकेज त्यांना देण्यात आले. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ते नोकरीच्या ठिकाणी रुजू होतील,

कोपरगाव : संजीवनी अभियांत्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी या बहुराष्ट्रीय कंपनीने अंतिम वर्षाच्या परीक्षेपूर्वीच नोकरीची संधी दिली. कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे त्यांची निवड करण्यात आली. प्रत्येकी सुमारे चार लाख रुपये वार्षिक पॅकेज त्यांना देण्यात आले. अंतिम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर ते नोकरीच्या ठिकाणी रुजू होतील, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे यांनी दिली. कोल्हे म्हणाले, ‘‘कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रसन्ना क्‍यातनवार, अनिकेत आघाव, साक्षी देशमुख, सुशांत वैद्य, दीपाली कोते, तेजस्वी जाधव, अनिरुद्ध जाधव, नयना धामणे, सागर गिरासे, जयप्रकाश गाडीलकर व सार्थक गोऱ्हे यांचा समावेश आहे.

संजीवनी शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, एमबीए, फार्मसी व महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो. त्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्‍यातील प्रत्येक गावातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक व नोकरदारांच्या मुलांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे या कुटुंबांची आर्थिक उन्नती होते आहे. माजी आमदार शंकरराव कोल्हे यांनी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून संस्थेची स्थापना केली, असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. डी. एन. क्‍यातनवार, उपप्राचार्य ए. जी. ठाकूर, विभागप्रमुख डॉ. डी. बी. क्षीरसागर, डॉ. एस. बी. आगरकर, प्रा. ए. ए. बारबिंड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डॉ. अभिषेक भागवत व संजय गवळी आदी उपस्थित होते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News