तरुणांना प्रशिक्षण कालावधीत नोकरी, नाष्टा, जेवन आणि १० हजार मानधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

राज्यातील लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. शिक्षणाची कोणतीची अट नाही. फक्त चौथी पास आणि वय १८ पुर्ण असणे आवश्यक आहे.    

पुणे : बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी क्रेडाई संस्थेने पुढाकार घेतला. अकुल कामगारांना दोन महिन्याचे प्रशिक्षण देऊन पुणे मेट्रोच्या बांधकाम क्षेत्रात रोजगार देण्याची हमी क्रेडाईने घेतली. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे. शिक्षणाची कोणतीची अट नाही. फक्त चौथी पास आणि वय १८ पुर्ण असणे आवश्यक आहे.    

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय, शासकीय कामे बंद झाली. त्यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. काम मिळत नसल्यामुळे परप्रांतीय मजूर लॉकडाऊन काळात स्वगृही परत गेले. राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन शिथिल केले. त्यामुळे व्यवसाय, उद्योगाची चक्रे हळूहळू फिरु लागली. मात्र परप्रातींय कामगार स्वगृही गेल्यामुळे राज्यात मजूरांची कमतरता जाणवू लागली. ही कमतरता भरुन काढण्यासाठी स्थानिक मजूरांना प्राधन्य देण्यात येत आहे.

नोकरी, नाष्टा, जेवन आणि १० हजार मानधन 

चौथी पास आणि १८ वर्ष पुर्ण असणाऱ्या तरुणांना क्रेडाई संघटनेद्वारे बारबेंडिंग टेक्निशियन आणि शटरिंग या दोन कोर्सेसचे विनामुल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दोन महिन्याचे आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दोन वेळा चहा, जेवन आणि एक वेळा नाश्ता मिळणार आहे. तसेच राहण्याची सोय केली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये मानधन आणि प्रशिक्षणानंतर १२ ते १५ हजार प्रति माह वेतन देण्यात येणार आहे. एक वर्ष यशस्वीरित्या काम करणाऱ्या मजूरांना १८ हजार रुपये पर्यंत वेतन वाढवले जाईन अशी माहिती क्रेडाईच्या व्यवस्थापकांनी दिली.

येथे करा संपर्क

इच्छूक उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी मयांक (८३९०९०२५००) आणि भावेश (९७६७६४५५८९) या तरुणांशी सपर्क करावा. सध्या पुण्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे युवकांना प्रशिक्षण कालावधीसाठी येणे शक्य नाही. राज्यातील २० तरुणांनी एकत्र येऊन प्रशिक्षणासाठी संपर्क केल्यास त्यांना पुण्यात आणण्याची सोय क्रेडाईकडून केली जाईल.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News