बारावी पास उमेदवारांसाठी नोकरी मोठी संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 'डाटा एन्ट्री ऑपरेटर' पदाची बंपर जाहीरात काढली आहे.

पुणे : कोविड- १९ विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग आहोरात्र काम करत आहे. मात्र आरोग्य विभागात अपूरे मनुष्यबळ असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा तान वाढत आहे. कोरोना रुग्णांची नोंदणी आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी मनुष्यबळागची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 'डाटा एन्ट्री ऑपरेटर' पदाची बंपर जाहीरात काढली आहे.  'डाटा एन्ट्री ऑपरेटर' पदाच्या जागा केवळ तात्पुर्त्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. त्यांचा कालावधी ९० दिवसांचा असेल. गरज भासल्यास कालावधी वाढवण्यात येईल. यामुळे भरतीमुळे राज्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार संधी मिळणार आहे. 

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र        पदांचे नाव    रिक्त जागा
 १.         डाटा एन्ट्री ऑपरेटर      १००

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा 
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा बारावी पास 
  • मान्यप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी 
  • मान्यप्राप्त (जीसीजी) मराठी ३० आणि इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट परीक्षा पास असावा.
  • एमएससीआयटी किंवा त्या समकक्ष संगणक परीक्षा पास
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद यांच्या इंग्रजी टंकलेखन ४० शप्रमि नुसार उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
  • पदवी पास उमेदवार मिळाले नाही तर बारावी पास उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाची अंतिम तारीख :

३१ जुलै २०२०

वयोमर्यादा :

  • उमेदवार कमीत कमी वय १८ वर्षे पुर्ण असावे.
  • जास्तीजास्त ४० वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज कसा करावा :

उमेदवारांना https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत वयाचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, गुणपत्रिका, नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॉन करुन अर्ज सबमीट करावा लागणार आहे. 

निवड प्रक्रीया: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, त्यानंतर टंकलेखन परीक्षा घेऊन अंतिन निवड यादी लावली जाणार आहे.

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: 
https://drive.google.com/file/d/17wXvTiMVNu6s29KUfRErWnLbjmExPPtd/view
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News