परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरीची संधी; पाहा किती आहेत जागा? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020
  • दहावीमध्ये जर तुम्हाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असतील तर कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता रेल्वेत नोकरी करता येणार आहे

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. दहावीमध्ये जर तुम्हाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असतील तर कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता रेल्वेत नोकरी करता येणार आहे. रेल्वेकडून तब्बल २७९२ जागांसाठी भरती निघाली आहे. अॅपरेंटिस पदासाठी ही भरती करण्यात आली असून याबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रेल्वेने याबाबत जाहिरात काढली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल २०२० आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आठवी, दहावी तसेच आयटीआयच्या ट्रेडमधील गुणांनुसार निवड करण्यात येणार आहे. 

यासाठी उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. उमेदवार हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच दहवीसोबतच त्याने आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले असावे. उमेदवाराला दोन्ही परीक्षांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळणे अपेक्षित आहेत. तसेच उमेदवाराचे वय १५ ते २४ वयोगटातील हवे. 

जनरल आणि ओबीसीतील उमेदवारांना अर्जासह १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही. दरम्यान कोणतीही परीक्षा यासाठी द्यावी लागणार नाहीये. त्यामुळे तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News