ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 1 March 2020
  • अर्ज भरण्याची तारीख २५ फेब्रुवारी असून अंतिम तारीख ९ मार्च २०२० पर्यंत आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.  

मुंबई : पदवीधर असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. Electronics Corporation of India Limited या कंपनीमध्ये पदवीधर झालेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. टेक्निकल ऑफिसर या पदासाठी ही भरती निघाली आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावेत. या पदासाठी ८ जागा आहेत. 

Electronics Corporation of India Limited या कंपनीत टेक्निकल ऑफिसरच्या ८ जागा रिक्त आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज भरण्याची तारीख २५ फेब्रुवारी असून अंतिम तारीख ९ मार्च २०२० पर्यंत आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.  

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे ३० वर्षांपेक्षा अधिक असून नये. यासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. कोणत्याही युनिव्हर्सिटीतून उमेदवाराने इंजिनिअरिंगची पदवी घेणे आवश्यक आहे.  याबाबत ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. 

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी कंपनीची वेबसाईट www.ecil.co.in/ येहते भेट द्या. त्याठिकाणी रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. हा अर्ज भरताना स्वतःची माहिती नीट भरणे आवश्यक आहे. त्यानंतर स्वतःचा फोटो आणि सही देखील अपलोड करावी लागेल. तसेच हा अर्ज भरताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया लेखी स्वरूपात होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News