केंद्र शासनात नोकरी सुवर्णसंधी; बारावी ते पदवी प्राप्त उमेदवारांना करता येणार अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची यांची स्वायत्त संस्था म्हणून एनबीई काम करते, आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा आयोजित करण्याचे काम एनबीई करते.

नवी दिल्ली :  नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन (NBE) मध्ये विविध पदांसाठी जाहिरात निघाली आहे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची यांची स्वायत्त संस्था म्हणून एनबीई काम करते, आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा आयोजित करण्याचे काम एनबीई करते. सध्या कोरोनामुळे आरोग्य विभागावर ताण वाढला आहे, त्यामुळे मनुष्य बळाची गरज आहे. ही गरल लक्षात देऊन नवीन जागा भरण्यात येणार आहे.  

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव                     पदे
१.          वरिष्ठ सहाय्यक                 १८                     
२.          कनिष्ठ सहाय्यक               ५७
३.         कनिष्ठ लेखाकार               ०७
४.          स्टेनोग्राफर            ०८      
   

शैक्षणिक पात्रता :

अनु. क्र.१ :  

  • मान्य प्राप्त संस्थेमधून पदवी उत्तीर्ण
  • एनबीईने निर्धारित केलेली परीक्षा उत्तीर्ण 

अनु. क्र.२ :  

  • मान्य प्राप्त शिक्षण संस्थेमधून बारावी उत्तीर्ण
  • विंडोज / नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टम/ आर्किटेक्चर कम्प्युटर
  • आणि बेसिक सॉफ्टवेअर वापरता येणे आवश्यक 

अनु. क्र.३ :  

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित विषयात पदवी किंवा वाणिज्य शाखेत पदवी
  • शासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा तीन वर्ष अनुभव
  • कम्प्युटर आधारित लेखन करण्याचे ज्ञान असावे.

अनु. क्र. ४ :  

  • बारावी परीक्षा उत्तीर्ण 
  • लघुलिपी ३० शब्द प्रती मिनिटी
  • ८० टायपींग मध्ये लघुलिपी
  • इंग्रजी शॉर्टहॅड आणि टंकलेखी परीक्षा द्यावी लागणार

वयोमार्यादा :

  • सर्वसाधारन उमेदवाराचे वय १८ वर्षे पुर्ण असावे. २७ वर्षापेक्षा अधिक नसावे.
  • मागास प्रवर्गासाठी ५ वर्षे शिथिल करण्यात आली.

अर्जकरण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

परीक्षा फी: 

  • ओपनसाठी १ हजार ५००
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५० रुपये

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News