JNU मी हल्ल्यासाठी मुलं जमा केली - ABVP च्या कार्यकर्त्यानं मान्य केला गुन्हा

यिनबझ टीम
Saturday, 11 January 2020

जेएनयू हिंसाचार: एबीव्हीपीच्या अक्षतने कॅमेऱ्यासमोर सांगितले- हल्ल्यासाठी मीच एकट्याने मुलं गोळा केली होती

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या 5 जानेवारीला दंगा झाला, ज्यात तोंडावर रुमाल बांधून गुंडांनी विद्यार्थी व शिक्षकांवर हल्ला केला. यात 35 लोक जखमी झाले. विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष इशी घोषही यात जखमी झाली. आता हे प्रश्न पुढे येत आहेत की हा प्रकार नेमका कोणी केला, ते गुंड कोण होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खुद्द गुंड जमा करणाऱ्या तरुणाने (अक्षत अवस्थी) स्वत: कॅमेऱ्यासमोर येऊन दिली आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना अक्षत म्हणतो की मी फ्रेंच पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. एबीव्हीपीचा (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) चा कार्यकर्ता आहे. अक्षत 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला होता. हेल्मेट घालून हातात काठी घेऊन उभा असलेला तरुण, तो मीच आहे, असं तो म्हणाला.

पेरियार वसतिगृहाजवळ अनेक झेंडे लावले होते, त्यातलील एख काठी घेऊन मी उभा होतो. तिथे एक दाढी असलेला मुलगा मला दिसला, तो काश्मिरीसारखा दिसत होता, म्हणून मी त्याला मारलं, त्यानंतर गेट तोडलं. मी कानपूरच्या अशा भागातून येतो, ज्या ठिकाणी खून आणि दरोडे ही साधी गोष्ट आहे.

पहिला हल्ला पेरियार येथे झाला. ही एक्शनची रिअॅक्शन होती. माझा एक मित्र आहे तो एबीव्हीपी संघटनेचा सचिव आहेत. मी त्यांना सांगितले की डाव्या संघटनेची मुलं साबरमती वसतिगृहात मिटींग घेत आहेत, त्यामुळे आपल्याला तिथे हल्ला करावा लागेल. 

मी जमावाला  गोळा केलं होतं. त्याच्यात 20 लोक जेएनयूचे विद्यार्थी होते आणि 20 लोकांना बाहेरून बोलावले होते. एबीव्हीपी अशाप्रकारे प्रत्युत्तर देईल याची कल्पना डाव्या विद्यार्थ्यांना नव्हती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News