JNU: हिंसाचार वेळी पोलिस मदतीसाठी का आले नाही ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

"JNUमध्ये अस्थिर परिस्थीती निर्माण झाली, यामुळे पोलिसांची नेमणूक कॅम्पसच्या गेटवर करावी, कॅम्पसमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांना बोलावण्यात येईल" असा व्हाट्सअॅप मॅसेज कुलसचिवानी पोलिसांना पाठवला

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 5 जानेवारीला संध्याकाळी 6. 24 वाजता पेरियार हॉस्टेल आणि साबरमती हॉटेवर हल्ला झाला, त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव जगदीश कुमार यांनी दिल्ली पुलिस साऊथवेस्टचे डीसीपी, एसीपी आणि वसंत कुंज (उत्तर) पोलिस स्टेशनच्या व्हाट्सएपवर एक संदेश पाठवला होता. पोलिसांनी कॅम्पसमध्ये न येता गेट वरचं उभ रहावं असा मॅसेज पाठवला होता. त्यामुळे हिंसाचार वेळी पोलिस मदतीसाठी आले नाहीत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

"JNUमध्ये अस्थिर परिस्थीती निर्माण झाली, यामुळे पोलिसांची नेमणूक कॅम्पसच्या गेटवर करावी, कॅम्पसमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांना बोलावण्यात येईल" असा व्हाट्सअॅप मॅसेज कुलसचिवानी पोलिसांना पाठवला होता.  

'कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई' केली यावर एक कमिटी बसवण्यात आली आहे. त्यात पोलिस सहआयुक्त अमुल्य पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शालिनी सिंह कमिटीच्या अध्यक्षा आहेत. कमिटीने दिलेला रिपोर्ट गृहमंत्रालयाकडे सादर जाणार आहे. यापुर्वी पोलिसांनी एका रिपोर्टमध्ये लिहलं आहे की, हल्लेखोर दुपारी 2.30 वाजता JNU मध्ये दाखल झाले होते. यानंतर 6 वाजेपर्यंत पोलिसांना 23 वेळा कॉल करण्यात आला होता.

कुलसचिवांच्या मॅसेजनंतर विद्यापीठ आणि पोलीस यांच्यात पुन्हा 7. 45 वाजता चर्चा झाली. विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांनी पोलिसांना पत्र लिहून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. 

6 जानेवारीला प्रमोद म्हणाले "सायंकाळी 6.30 पर्यंत पोलिस JNU परिसरात होती. पोलिसांना पत्र पाठवुन औपचारिक रित्या माहिती दिली होती, कुलसचिवांनी सायंकाळी 5.30 वाजता पोलिसांना संपर्क केला हाता" असे ही सांगितले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सौउथवेस्टच्या डीसीपीने सायंकाळी 5.15 वाजता कॅम्पसची चौकशी केली, परंतु त्यावेळेस सामान्य परिस्थिती होती म्हणून डीसीपी मेन गेटवरुन परत गेले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता JNUच्या शिक्षक संघटना आणि विद्यार्थी साबरमती हॉस्टेलवर 'शांती मार्च' करिता जमा झाले होते. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी विद्यार्थी व शिक्षकांवर दगड मारले, साबरमती हॉस्टेलमध्ये घुसुन तोडफोड केली आणि विद्यार्थ्यांना मारहान केली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News