जेएनययूमध्ये झालेला हल्ला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दाबण्यासाठीच..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ  काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली.
  • दरम्यान यावेळी यिनबझने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्याचसंदर्भात रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जेएनयु हल्ल्यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया

आज विद्यार्थ्यांमधील अस्वस्थेमागची कारणे फक्त राजकीय आहेत. आजच्या तरुणांनी राजकारणात समाविष्ट होणे गरजेचे आहे. कारण तरुणाई हाच देशाच्या विकासाचा पहिला पाया आहे. त्यामुळे राजकारण काय असत, हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आज राजकीय पक्ष विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. कारण त्यांचाद्वारेच वातावरण निर्मिती आणि प्रचार हा मोठ्या प्रमाणत होतो. आज विद्यार्थी संघटना देखील विद्यार्थाचे महत्त्वाचे  काय प्रश्न आहे ते जाणून घेत नाहीत. जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा विद्यार्थ्यांनी उठवलेल्या प्रश्नांना दाबण्यासाठी केला आहे, ज्यामुळे कुठेतरी लोकशाहीला हा देश पडद्याआड घालण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये पोलिसांची भूमिका योग्य होती, कारण आंदोलन करून प्रश्न सुटत नाहीत.
- मनीषा दादासाहेब काशीद, रामणारायन रुईया महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News