JNU हल्ला केवळ जाणीवपूर्वक घडवून आणला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • नांदेड येथील जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात नांदेड येथील जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात अशी प्रतिक्रिया दिली.

राजकारणी केवळ आपली भाकरी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करुन त्यांना देशोधडीला लावतात. मानसिक छळ करतात, ज्यातून अनेकजण वाममार्गाला लागतात. तरुणांनी राजकारणात प्रवेश करुन आपल्या प्रश्नाची सोडवणूक करावी. काही विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करतात पण काही नाममात्र अस्तित्वात असून त्या राजकीय दाबावाली काम करतात. सर्व राजकीय लोक हे एकच आहेत कारण त्यांचा हेतू स्पष्ट असून प्रत्येकजण आपापल्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी संघर्ष करत असतात आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकतात. विद्यार्थ्यांवरचा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. हल्ला केवळ जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे यातून केवळ सामाजिक अस्तिरता निर्माण केला जात आहे. पोलीस हे राजकीय नेते मंडळींच्या दबावाखाली काम करतात कारण पोलीसच नव्हे तर संपूर्ण अधिकारी व कर्मचारी हे राजकीय दबावाखाली काम करतात त्यामुळे त्यांचा हुकूम हा अनेक कर्मचाऱ्यांना मानावा लागतो.
- कुलदीप सुर्यवंशी,
विद्यार्थी, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, नांदेड

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News