निसर्गरम्य 'जीवधन' गिरीदुर्ग किल्ला

रसिका जाधव
Saturday, 23 March 2019

घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्टय म्हणजे बांबूची बने. सारे जंगले हे बांबूच्या बनांचे आहे. गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. 

जीवधन किल्ला ३७५४ उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणघाट डोगररांगेतील हा किल्ल्या ट्रेकर्सच्या दुष्टीने कठीन समजला जातो.

घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला 'जीवधन' किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गवर सरंक्षणसाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटपासून अगदी सादेच्या अंतरावर आहे. 

इतिहास :-

शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. पण याची साक्ष देणारा एकमेव किल्ल्या म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज 'मूर्तीजा निजाम' याला जीवधन या गडावर केदेत असताना त्याला सोडवून संगनेरजवळ असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्टय म्हणजे बांबूची बने. सारे जंगले हे बांबूच्या बनांचे आहे. गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. 

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-

पश्चिम दरवाज्याने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला 'कोठी' असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतभागात एकात एक अशी पाच धान्यकोठरं आहेत.

 

आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज-मराठे युध्दात १८१८ मध्ये या कोठड्यांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडाचा आकार आयताकृती आहे. वांदरलिंगीच्या कड्यापासून कोकणचे निसर्गरम्य दर्शन होते. समोरच नानाचा अंगठा, हरिशचंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसईचे छोटसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत पाहून होतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News