जिओ- बीपी ३ हजार ५०० पंप सुरु करणार; ६० हजार तरुणांना नोकरी मिळणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020

तरुणांना उद्योजक होण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. या तरुणांना मोठी नफा कमवता येणार आहे. त्याचबरोबर ६० हजार स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी रिलयान्स जिओ आता पेट्रोलीयम क्षेत्रात आपला विस्तार वाढवणार आहे. काही दिवसात भारतामध्ये ३ हजार ५०० नवीन पेट्रोलपंप सुरु करण्याची योजना मुकेश अंबानी यांनी जाहीर केली. या योजनेत तरुणांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना उद्योजक होण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. या तरुणांना मोठी नफा कमवता येणार आहे. त्याचबरोबर ६० हजार स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज (jio) आणि बिटीश पेट्रोलियम (BP) याच्या संयुक्त भागीदारीने जिओ- बीपी (jio-BP) नावाचा नवीन ब्रॉड संपुर्ण देशात ३ हजार ५०० नवीन पेट्रोलपंप उघडणार आहे. पेट्रोल, डिझल, प्लाझा, ऑईल, अव्हीएशन फ्यूअल इत्यादी उत्पादने विकणार आहे. त्यासाठी फ्रंचाइसी, डिलरशीप मागवण्याची प्रक्रीया सुरु झाली. रिलायन्स पेट्रोलियमच्या अधिकृत संकेतस्थावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

फ्रंचाइसी, डिलरशीप घेण्यासाठी सोप्या अटी व नियम देण्यात आले आहे. रिलयान्स पेट्रोलीयमच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. अर्जात विचारलेली माहीती नाव, संपुर्ण पत्ता, शहर, वय, शैक्षणिक तपशील, पंपाचे ठिकाण, सध्याचा व्यवसाय इत्यादी माहीती भरुन अर्ज सबमीट करायचा आहे. त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल. पंपाचे ठिकाण पाहण्यासाठी कंपनीचे अधिकारी येतील, जमीनीचे मोजमाप, संपुर्ण माहिती घेऊन जातील. अर्जदाराला पुढील प्रक्रीया करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात बोलवतील. त्यानंतर कार्यालयीन प्रक्रीया पुर्ण करुन पंपाला परवानगी मिळेल. 

६० हजार तरुणांना मिळणार रोजगार 

पेट्रोल पंप भारणीतून देशात ६० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. लॉकडाऊमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले, कंपन्यात काम करणारे लाखो कामगार बेरोजगार झाले. अशा कठीन परिस्थितीत ६० हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तर काहींना नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळणार आहे. बीपी कंपनीने २०१९ मध्ये रिलायन्स सोबत भागीदारी केली. रिलायन्स पेट्रोलियमचे १ हजार ४०० पंप आणि विमान इंधनाचा ४९ ट्क्के भाग विकत घेतला. त्यामुळे जिओ-बीपी यांनी एकत्र येऊन नवीन पंप सुरु करण्याची योजना आखली. ही योजन किती यशस्वी होते? येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

अधिक माहीतीसाठी https://www.reliancepetroleum.com/businessEnquiry या लिंकवर मिळेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News