ज्वेल्स ऑफ नवी मुंबई’मध्ये प्री वेडिंग शूटचे सनई चौघडे!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • मागील काही वर्षांपासून लग्नाच्या तयारीमध्ये प्री वेडिंग शूटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत आहे.
  • या फोटोशूटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व बॅकग्राऊंडला आहे आणि अशा फोटोजेनिक सुंदर जागांच्या शोधात सध्या सगळ्यात अग्रेसर स्थान नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईचे आहे. 

नवी मुंबई - मागील काही वर्षांपासून लग्नाच्या तयारीमध्ये प्री वेडिंग शूटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत आहे. या फोटोशूटमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व बॅकग्राऊंडला आहे आणि अशा फोटोजेनिक सुंदर जागांच्या शोधात सध्या सगळ्यात अग्रेसर स्थान नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईचे आहे. 

सुशोभित केलेले स्वच्छ रस्ते, हिरवळ, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, तलाव व तेथील बसण्याची व्यवस्था, मोकळी जागा, फोटोग्राफी करण्यासाठी नयनरम्य बॅकग्राऊंड, स्वच्छतागृहांची सोय यामुळे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. जॉगिंग, योगा, मेडिटेशन, भेटण्याचे व पिकनिक स्पॉट यासोबतच आता फोटोग्राफीसाठी ही जागा आता नागरिकांच्या आवडत्या ठिकाणांच्या यादीत आली आहे. 

इतर फोटोग्राफीसोबत मुख्यतः प्री वेडिंग शूटसाठी नवी मुंबई, ठाणे; तसेच मुंबईतीलही तरुणाई येथे येत असल्याचे नेरूळ येथील हीड फ्रेम्सच्या सलाम सलिह यांनी सांगितले. माझे बरेच ग्राहक अनेक सुविधा, मोकळी जागा, तलाव, तसेच इथल्या प्रसन्न वातावरणामुळे येथे फोटोग्राफी करण्याचा आग्रह धरतात. फोटोग्राफी करताना कोणी अडवत किंवा त्रास देत नसल्याने ही जागा तरुणाईमध्ये आणखी फेमस होत आहे, असेही सलिह यांनी सांगितले.

सीवूडस व नेरूळ या रेल्वेस्थानकांपासून चालत फक्त १५ मिनिटांवर असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबईला विविध ठिकाणांहून नागरिक भेट देत असतात. जॉगिंग, योगा, व्यायाम, बॅडमिंटनसारखे गेम्स, सायकलिंग याचसोबत निवांत गप्पा मारणे, प्रसन्न वातावरणात निसर्गाचा आस्वाद घेणे, फोटो काढणे अशा अनेक गोष्टी येथे करता येण्यासारख्या आहेत.

मोफत एंट्री, सुरक्षा कर्मचाऱ्यांची व्यवस्था, फोटो काढण्यासाठी तसेच कॅमेऱ्यासाठी कसलाही कर नसल्याने तसेच थिंक मॅनचा पुतळा, ज्वेल ऑफ नवी मुंबईचा लोगो, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, तलावामध्ये दिसणारे उंच बिल्डिंगचे प्रतिबिंब, सुंदररीत्या आखलेले रस्ते यामुळे ही जागा लोकप्रिय होतेय. वाशी येथील रिया जोशी सांगते, की एका मैत्रिणीचे प्री वेडिंग शूट आम्ही येथे केले आणि तलावाच्या बॅकग्राउंडमुळे फोटोज इतके झकास आलेत की आम्ही खूप खुश आहोत. 

वी लव्ह ज्वेल ऑफ मुंबई. छायाचित्रकार अनुपम मोर्यांच्या मते फोटो शूटिंगसाठी किंवा कॅमेरा पार्कमध्ये नेण्यासाठी कसलेही चार्ज नसल्याने ही जागा छायाचित्रकारांना जास्त आवडते. सीवूडच्या श्‍याम दाभाडे यांनी सांगितले, की मला ज्वेल ऑफ नवी मुंबईबद्दल खूपच अभिमान वाटतो. आमच्याकडे पाहुणे आल्यावर आम्ही आवर्जून त्यांना येथे फिरायला आणतो.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News