असा असतो, दागिन्यांचा फ्युजन लूक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

सणांच्या मोसमात पारंपरिक दागिन्यांना अधिक मागणी असते; पण एकदा हा मोसम ओसरला की मात्र हे 
दागिने कपाटात पडून राहतात. ते नेहमीच्या जीन्स, टी-शर्ट अशा वेस्टर्न लुकला साजेसे दिसतीलच, असे नाही. या सगळ्यांचा विचार करून यंदा बाजारात फ्युजन दागिन्यांची रेलचेल सुरू झाली आहे.

सणांच्या मोसमात पारंपरिक दागिन्यांना अधिक मागणी असते; पण एकदा हा मोसम ओसरला की मात्र हे 
दागिने कपाटात पडून राहतात. ते नेहमीच्या जीन्स, टी-शर्ट अशा वेस्टर्न लुकला साजेसे दिसतीलच, असे नाही. या सगळ्यांचा विचार करून यंदा बाजारात फ्युजन दागिन्यांची रेलचेल सुरू झाली आहे.

दागिने म्हणजे जगाच्या पाठीवरच्या तमाम स्त्री-वर्गाचा जीव की प्राण. त्यात भारतीय स्त्रीचे दागिन्यांशिवाय पानही हलत नाही. अशा वेळी गणपती, नवरात्र, दिवाळी अशा पुढे येऊ घातलेल्या सणांच्या मौसमात दागिने हवेतच. एरवी सणांसाठी खास पारंपरिक पद्धतीचे दागिने घेतल्यास ते नंतर कॉलेज, ऑफिसला सहसा वापरता येत नाहीत. सध्या बाजारात फ्युजन दागिन्यांची चर्चा आहे, जे तुम्ही पारंपारिक सणांना आणि एरवीही सहज वापरू शकता.
भारतात दागिन्यांचे असंख्य प्रकार आहेत. अगदी प्रांतागणिक यात मोटीफ, स्टाईल यांची विविधता येते. त्यात इमिटेशन ज्वेलरीचा पर्याय आल्यामुळे हे दागिने वापरायला सोईचे ठरतात. सणांच्या मौसमात या पारंपरिक दागिन्यांना अधिक मागणी असते; पण एकदा हा मौसम ओसरला की मात्र हे दागिने कपाटात पडून राहतात.

दागिने इमिटेशनचे असले तरी ते वजनाने जड असतात. नेहमीच्या जीन्स, टी-शर्ट अशा वेस्टर्न लुकला साजेसे दिसतीलच, असे नाही. या सगळ्याचा विचार करून यंदा बाजारात फ्युजन दागिन्यांची रेलचेल सुरू झाली आहे. हे दागिने सुटसुटीत, हलके असतात आणि कोणत्याही लुकवर सहज जुळून येतात. त्यामुळे अगदी रोजही सहज वापरू शकता.

क्रिस्टल ज्वेलरी
पारदर्शी, वेगवेगळ्या रंगाची फिकट छटा असलेले, कधी छान आकार असलेले; तर कधी काहीसे ओबडधोबड क्रिस्टल पहिल्या नजरेतच लक्ष वेधून घेतात. हेच क्रिस्टल सध्या दागिन्यांमध्ये सामील झाले आहेत. याआधी बारीक, नाजूक क्रिस्टलच्या माळा ज्वेलरकडे पाहायला मिळायच्या. पण सध्या काहीशा मोठ्या आकाराचे क्रिस्टलचे इमिटेशन दागिने बाजारात आले आहेत. त्यात पेंडेंट, ब्रेसलेट, नेकपीस, इअररिंग्स, अंगठ्या असे प्रकार प्रामुख्याने दिसतात. सणांच्या दिवसात एखादा नेकपीस ड्रेस किंवा साडीवर नक्कीच घालू शकता. एरवीच्या गोल्ड, सिल्व्हर ज्वेलरीपेक्षा याचा लुक वेगळा दिसेल.

गेरू फिनिश ज्वेलरी
अँटिक ज्वेलरी सध्या तरुणींची लाडकी आहेच. काहीशी काळसर छटा असलेली, कुंदन, खड्यांचा वापर केलेल्या अँटिक ज्वेलरीला सणांच्या सिझनमध्ये विशेष मागणी असते. यंदा यामध्ये गेरू फिनिश असलेली ज्वेलरी भाव खात आहे. या ज्वेलरीमध्ये दागिन्यांना सोन्याचा मुलामा देताना लालसर छटा दिली जाते. हा रंग गेरूच्या रंगाप्रमाणे गडद लाल असतो. त्यामुळे गेरू फिनिश ज्वेलरी म्हणतात. यात खास टेम्पल ज्वेलरी डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यात इमिटेशन ज्वेलरी तर आहेतच; पण एक ग्राम सोन्याचे दागिनेही उपलब्ध आहेत. नेकपीस, बांगड्या, कानातले डूल, मंगळसूत्र पेंडंट असे पारंपरिक प्रकार यात पाहायला मिळतात.

हटके स्टाईल्स
नेहमीचे नेकपीस, बांगड्या यांना रजा देत काही वेगळ्या धाटणीचे दागिनेही बाजारात आले आहेत. मुख्य म्हणजे यांची प्रेरणा पारंपरिक दागिन्यांमधून घेण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि वेस्टर्न लुकसोबत हे दागिने सहज जुळून येतात. कॉकटेल रिंग्स हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहेच. हातात एकच मोठाली खड्याची अंगठी घातली की इतर बांगड्या, कडे यांची गरज नसते. याचबरोबर सध्या कॉकटेल इअररिंग्ससुद्धा बाजारात आले आहेत. लांब आकाराचे हे कानातले लगेच नजरेत भरतात आणि यांच्यासोबत नेकपीस, पेंडंटची गरजही नसते. हातफुल हाही यातलाच एक प्रकार. कड आणि अंगठी यांना जोडून बनणारं हातफूल पारंपरिक दागिन्यांचा प्रकार असला तरी फ्युजन ज्वेलरीचा एक भाग बनलं आहे. तसंच सध्या अँटिक फिनिशचे बाजूबंद बाजारात आले आहे. यांची डिझाईन्स मॉडर्न आणि वेस्टर्न लुकला साजेशी आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News