जेईई मेन, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 July 2020

मागील तीन महिन्यांपासून देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पालकांची आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केंद्रीय मंत्रालयाला केली आहे. त्याअनुषंगाने रमेश पोखरियाल यांनी 'एनटीएच्या महासंचालकांना विनंती केली, की परिस्थिचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमावी परीक्षेसंदर्भात ठोस निर्णय जाहीर करावा.

देशभरातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्याक्रमासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसाठी 'जेईई मेन' आणि 'नीट' या परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात. पण यंदा कोरोनाचा देशभर इतका संसर्ग झाला आहे की, कोरोनामुळे उद्धवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती लवकरचं अहवाल नॅशनल टेस्टिंग केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाला देणार आहे. त्यानंतर परीक्षा घ्यायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. 

मागील तीन महिन्यांपासून देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पालकांची आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केंद्रीय मंत्रालयाला केली आहे. त्याअनुषंगाने रमेश पोखरियाल यांनी 'एनटीएच्या महासंचालकांना विनंती केली, की परिस्थिचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमावी परीक्षेसंदर्भात ठोस निर्णय जाहीर करावा. नेमलेली कमिटी जो निर्णय देईल त्यावर, विचार करूनचं निर्णय घेण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. देशभरात गोंधळ असलेल्या या परीक्षेबाबत लवकरच निर्णय होईल असंही त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News