जेईई मेन परीक्षेला आज पासून सुरूवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्या की, घेऊ नये यावर अनेक राजकीय वाद देखील झाले होते.
  • परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आणि सर्वोच्च न्यायलयाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर आज, मंगळवार ०१ सप्टेंबर पासून जेईई मेन परीक्षेला संपूर्ण देशभरात सुरूवात झाली आहे.

मुंबई :- कोरोनाच्या काळात परीक्षा घ्याव्या की, घेऊ नये यावर अनेक राजकीय वाद देखील झाले होते. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आणि सर्वोच्च न्यायलयाने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर आज, मंगळवार ०१ सप्टेंबर पासून जेईई मेन परीक्षेला संपूर्ण देशभरात सुरूवात झाली आहे. विद्यर्थांना आरोग्यविषयक संपूर्ण सुरक्षेच्या खबरदारीसह परीक्षा केंद्रांच्या आता सोडण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने परीक्षा केंद्राच्या आत सोडले जात आहे ते व्हिडिओत पाहा

 

 

 

मुंबई तसेच उपनगरातील विद्यार्थ्यांसमोर प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. यावर आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने तोडगा काढला असून या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार तसेच पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी संयुक्त प्रसिद्ध पत्रकात स्पष्ट केले आहे. यामुळे मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उद्य सांमत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला आणि विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News