जेईई मेन आणि नीट परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना आयआयटीचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचवणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020

जेईई मेन आणि नीट परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना आयआयटीचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचवणार

जेईई मेन आणि नीट परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना आयआयटीचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचवणार

मुंबई - जेईई मेन आणि नीट या दोन परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्या केव्हा होणार याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक वाहतूक अद्याप सरकारकडून सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर कसे पोहचायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांसाठी पवई येथील आयआयटीने मदतीचा हात पुढे केला आहे.

www.eluried.in/असे पोर्टल असून आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हे वेबपोर्टल चालू केलं आहे. परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यासाठी हे सुरू केलं असून विद्यार्थ्यांनी तिथं आपली नोंद करावी. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या केंद्राची माहिती देताना वाहतुकीची विनंती करावी. तसेच विद्यार्थ्यांना मदत करणारे आणि माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा पोर्टलवरती नोंदणी करावी. विद्यार्थ्यांना स्वत: च्या वाहनातून परीक्षा केंद्रावर पोहचवणार की त्यासाठी देणगी देणार याची नोंदणी करावी व त्याची माहिती द्यावी. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केलेली ही मदत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News