जेईई, नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम; त्यासाठी परीक्षार्थींसाठी दहा लाख मास्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, जेईई (मेन) आणि नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे.
  • ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षार्थींसाठी आरोग्यच्या सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ६६०० लिटर हॅंड सॅंनिटायझर इत्यादी गोष्टी सुमारे १३ कोटी रूपये खर्च करून घेतल्या आहेत.

नवी दिल्ली :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, जेईई (मेन) आणि नीट परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने परीक्षार्थींसाठी आरोग्यच्या सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ६६०० लिटर हॅंड सॅंनिटायझर इत्यादी गोष्टी सुमारे १३ कोटी रूपये खर्च करून घेतल्या आहेत.

अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जेईई (मेन) ही ऑनलाईन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत, तर वैद्यकीय, तसेच दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी नीट ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय ६६०० स्पंज, ३,३०० स्प्रे बाटल्या विकत घेण्यात आल्या असून, परीक्षेच्या दिवसांत ३,३०० स्वच्छता कर्मचारी परीक्षा केंद्रांवर सज्ज असतील. जेईई (मेन) या परीक्षेला सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी बसणार असून, तिथे १.१४ लाख जण पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी एनटीएने जय्यत तयारी केली आहे. जेईई (मेन) आणि नीट परीक्षा कोरोनाच्या काळात घेण्यास काही राज्य सरकारांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना

जेईई (मेन) आणि नीट परीक्षांच्या दर ३० परीक्षार्थींमागे २ पर्यवेक्षक ठेवण्यात आले होते. आता हेच प्रमाण १५ परीक्षार्थींपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. आता पर्यवेक्षकांची संख्या वाढवून ती १.४ लाख करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी २० मिनिटांच्या कालावधीत किमान ४० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News