जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा : 'या' २२२ शहरांत होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 27 September 2020
  • जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा आज २७ सप्टेंबर २०२० रोजी देशभरातील २२२ शहरांतील एक हजार परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. ]
  • देशातील आयआयटी आणि 'एनआयटी'त प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी ही परीक्षा आहे.

मुंबई :- जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा आज २७ सप्टेंबर २०२० रोजी देशभरातील २२२ शहरांतील एक हजार परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. देशातील आयआयटी आणि 'एनआयटी'त प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी ही परीक्षा आहे. यंदा आयआयटी दिल्लीकडून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

'जेईई मेन्स'च्या निकालातून पात्र होणारे विद्यार्थी ही परीक्षा देतात. साधारण एक लाख ६० हजार विद्यार्थी परीक्षा देण्याची शक्यता आहे. सकाळी ९ ते १२ पहिल्या टप्प्यात पेपर एक, तर दुपारी २.३० ते ५.३० या दुसऱ्या टप्प्यात पेपर दोन होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सुरक्षित अंतराच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी करू नये, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) नीट प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली असून, विद्यार्थी-पालकांना ती वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे 'एनटीए'कडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयआयटी अलुम्नायने एक पोर्टलही लाँच केले आहे. Eduride असे या पोर्टलचे नाव आहे, अशी माहितीही आयआयटी दिल्लीने दिली आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे, असा आयआयटी दिल्लीचा दावा आहे. मास्क वापरणे, स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत पारदर्शक बाटलीत बाळगणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. या गोष्टींशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोणकोणत्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करायचे आहे त्या पुढीलप्रमाणे :-

 

  • विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे फेसमास्क वापरावेत आणि पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर बाळगावे. पाण्याची बाटलीही पारदर्शक हवी.
  • दोन जणांमध्ये कायम किमान सहा फुटांचे अंतर हवे. यासाठी परीक्षा केंद्रांवर रांग लावण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात येईल. तेथील कर्मचारी सांगतील त्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे.
  • परीक्षा केंद्रात शिरताना विद्यार्थ्यांच्या अॅडमिट कार्डवरील बार कोड स्कॅन होईल. त्यानंतर त्यांनी परीक्षा हॉलचा क्रमांक दिला जाईल.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी हात सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
  • परीक्षेसाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ सेल्फ डिक्लेरेशन असणे गरजेचे आहे, अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News