जेईई अॅडव्हान्स्ड २०२०: परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी या सूचना पाळणं गरजेचं

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

ज्या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा द्यायची आहे, अशा ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे असं दिल्ली आयआयटीने दावा केला आहे. मास्क वापरणे, स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत पारदर्शक बाटलीत बाळगणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. या वस्तू ज्या विद्यार्थ्यांकडे नसतील तर त्याला केंद्रात घेतले जाणार नाही.

महाराष्ट्र - १२ वी नंतर करिअर कशात करायचं यासाठी परीक्षा असते. ती उत्तमरीत्या पास झाल्यानंतर तुमचं करिअर फायनल होतं. उद्या २७ सप्टेंबर जेईई अॅडव्हान्सडची परीक्षा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांला अभियांत्रिका क्षेत्रात जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा उद्या सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० या कालावधीत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचनांचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

आयआयटीकडून विद्यार्थांना परीक्षा पोहचण्यासाठी एक वेबपोर्टल तयार केले आहे. त्याचं नाव Eduride असं आहे अशी माहिती आयआयटी दिल्लीने दिली आहे.
 
या गोष्टीचं पालन करणं गरजेचं
१ विद्यार्थ्यांनी स्वत:चं फेसमास्क वापरावं, सॅनिटायझर असावं, तसेच पाण्याची बाटली सुध्दा वैयक्तिक असावी.
२ केंद्रावर दोन विद्यार्थ्यांमधलं अंतर ६ फुटाचं असावं, केंद्रावर पोहचल्यानंतर तेथील अधिकारी सांगतील तसं वागावं
३ परीक्षा केंद्रात शिरताना विद्यार्थ्यांच्या अॅडमिट कार्डवरील बार कोड स्कॅन होईल. त्यानंतर त्यांनी परीक्षा हॉलचा क्रमांक दिला जाईल.
४ केंद्रात प्रवेश करण्याच्या आगोदर हात सॅनिटाईज करणं गरजेचं आहे.
५ परीक्षेसाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ सेल्फ डिक्लेरेशन असणे गरजेचे आहे, अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
 
भारतात ही परीक्षा २२२ शहरांमध्ये होणार आहे. तसेच १ हजार परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी १ लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News