'या' तारखेला होणार जेईई ॲडव्हान्स परीक्षा; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020

ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेत टॉप केलेले 2 लाख 50 हजार विद्यार्थी ॲडव्हान्स परीक्षेत सहभागी होऊ शकतील. जेईई ॲडव्हान्स परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : देशातील नामांकीत संस्था आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेत टॉप केलेले 2 लाख 50 हजार विद्यार्थी ॲडव्हान्स परीक्षेत सहभागी होऊ शकतील. जेईई ॲडव्हान्स परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

जेईई ॲडव्हान्स आणि संयुक्त प्रवेश परीक्षा बोर्ड यांच्या मार्गदर्शनानुसार सात कोऑर्डिनेटिंग झोनमध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी आयआयटीने कसून तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्याच्या संपुर्ण आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कसे करावे जेईई ॲडव्हान्स परीक्षेची रजिस्ट्रेशन

  • विद्यार्थ्यांनी www.jeeadv.ac.in या जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करावे 
  • लॉग इन केल्यानंतर दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी 
  • माहिती भरल्यानंतर परीक्षा शुल्क अदा करावे.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंगद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरता येणार आहे.  
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमीट करायाचा आहे. अर्ज समबीट केल्यास रजिस्ट्रेशन पुर्ण होईल.
  • जेईई ॲडव्हान्स परीक्षा चांगल्या गुणाने पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News