जे. डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालयात 'फिशेरी' कोर्स; विद्यार्थ्यांसाठी खास व्यवसाईक शिक्षण

निखिल ठाकरे
Sunday, 13 September 2020

२०२०-२१ करिता शासनाने 'फिशेरी' (फ्रेश वॉटर फिश कल्चर) अभ्यासक्रमाला कौशल्य विकास व उद्योजगता विभागाने मान्यता दिली

समुद्रपूर : काळाची पावले ओळखून सरकारने व्यवसाईक शिक्षणला प्राधन्य दिले आहे, त्यामळे विद्यार्थ्यांना नोकरी बरोबर स्वतंत्र व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील वासी (कोरा) येथील जे. डी. चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाला सत्र २०२०-२१ करिता शासनाने 'फिशेरी' (फ्रेश वॉटर फिश कल्चर) अभ्यासक्रमाला कौशल्य विकास व उद्योजगता विभागाने मान्यता दिली, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे. 

विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये मास्यांचे संगोपल, उत्पादन कसे करावे? या विषयी शिकवले जाणार आहे. उत्पादणातून विक्री करणे आणि अधिकाधिक नफा मिळण्यासाठी बाजार काशी काबीज कारावी याची सविस्तर माहिती कोर्समध्ये मिळणार आहे. हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी १० वी पास असणे आवश्यक आहे. फिशेरी (फ्रेश वॉटर फिश कल्चर) कोर्स नंतर बी. एससी आणि अग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाला प्राधान्य आहे. 

शासन निर्णय क्र. व्ही. ओ.सी. २०१७. /प्र. क्र. १५७/व्या. शि. क्र. ०४ नुसार  दि. ११ सप्टेंबर २०२० रोजी पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम + २ स्तरावरील द्विलक्षी उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने 'फिशेरी' (फ्रेश वॉटर फिश कल्चर) अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबर व्यवसाईक शिक्षण मिळणार आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना ११ वी साठी प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थ्यांनी 'फिशेरी' अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. भविष्यात हा अभ्यासक्रम रोजगार निर्मितीसाठी उपोयोगी येणार आहे. असे मत स्वानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव चौधरी यांनी व्यक्त केले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News