काविळीला इंग्रजीमध्ये jaundice म्हणतात. कावीळ झाली म्हटल, की अतिशय दुर्धर, किचकट दुखणे डोळ्यांसमोर येते. अनेक समज, गैरसमज डोळ्यांसमोर उभे राहतात. अगदी प्राचीन काळापासून कावीळ हा आजार बरा करण्यास अवघड आणि गंभीर स्वरूपाचा समजला जातो. सुश्रुतसंहितेत काविळीचा उल्लेख ‘पंडुरोग’ असा केला आहे. तसेच हिप्पोक्रेट्सच्या काळापासूनही कावीळ आढळते. अत्याधुनिक वैद्यकशास्त्रात काविळीविषयी भरपूर संशोधन झालेले असून, काविळीवर आज अचूक उपचारपद्धती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यकृतरोपणासारखा अगदी टोकाचा उपचारही घेता येतो. त्यामुळेच काविळीविषयी अचूक माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

कावीळ म्हणजे काय?
त्वचा तसेच डोळ्यांचा पांढरा भाग (sclera) पिवळसर होणे यालाच कावीळ असे म्हणतात. यकृताच्या आजाराचे कावीळ हे महत्त्वाचे लक्षण आहे. ग्रीक भाषेत काविळीला Ikteros (The Condition) असे संबोधतात. रक्तामधील bilirubin चे प्रमाण वाढले की त्वचेवर आणि डोळ्यांमध्ये पिवळेपणा येतो.
कावीळ का होते आणि काविळीचे प्रकार कोणते?
सर्वसाधारणपणे यकृताच्या आजारांमुळे कावीळ होते. काही कारणांनी लाल पेशी जास्त प्रमाणात तुटू लागल्या, तर कावीळ होते. तसेच पित्ताच्या मार्गात अडथळा तयार झाल्यासही कावीळ होते.
प्रकार
1.(prehepatic liver) यकृत व्याधींमुळे होणारी कावीळ
2.(Hepatic)चयापचयाच्या जन्मजात व्याधी विषाणूंमुळे होणारी 4.कावीळ, मद्यसेवन, स्थूलपणामुळे होणारी कावीळ
5. पित्त साचल्यामुळे होणारी कावीळ
कारणे-
१. लाल पेशी तुटल्यामुळे
२. Bilirubin
३. पित्तवाहिनींचे आजार (post-nepatic) पित्तमार्गातील अडथळा
४.खडे, कर्करोग, पित्तमार्ग लहान होणे
काविळीची सर्वसाधारण कारणे-
१) यकृताचे आजार (Hepatic) : या प्रकारची कावीळ सर्वांत अधिक आढळते. साथीची कावीळ, संसर्गजन्य कावीळ, मद्यपानामुळे होणारी कावीळ, तसेच स्थूलपणामुळे होणारे यकृताचे आजार या प्रकारांत मोडतात.
२)पित्तमार्गातील अडथळा हा काविळीचा दुसरा प्रमुख प्रकार समजला जातो. कित्येक वेळा पित्ताच्या खड्यांमुळे अथवा पित्तनलिकेच्या कर्करोगामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे पित्तमार्ग लहान होतो आणि कावीळ होते. त्याचप्रमाणे, पित्तवाहिन्यांना काही आजार होतात.
३) यकृताव्यतिरिक्त यकृतपूर्व (prehepatic) कारणे
काही कारणांनी लालरक्तपेशी तुटू लागल्या, तर लोहबिंदूंचे पृथक्करण होऊन कावीळ होते. त्यालाच haemolysis असे संबोधतात.
वरील सर्व बाबींचा विचार करता असे नक्कीच निदर्शनास येते, की कावीळ हा गंभीर आजार असून, त्याची कारणे शोधणे आवश्यक आहे. त्यामुळेच अचूक निदानच काविळीच्या योग्य उपचाराची पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरते.