'या' राज्यात शिकविली जाणार जपानी भाषा; मिळणार रोजगाराची नवी संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • पंजाब कौशल्य विकास अभियानांतर्गत युवकांना जपानी भाषा शिकविली जाणार आहे. सरकारने 200 तासांचा हा कोर्स दोन-टप्प्यांच्या  प्रशिक्षणात विभागला आहे.

पंजाब कौशल्य विकास अभियानांतर्गत युवकांना जपानी भाषा शिकविली जाणार आहे. सरकारने 200 तासांचा हा कोर्स दोन-टप्प्यांच्या  प्रशिक्षणात विभागला आहे. यात 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांचा सहभाग असेल. यासाठी जपानी दूतावासातील बैठकीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.

रोजगार निर्मिती, औद्योगिक प्रशिक्षण मंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी ही माहिती दिली. या जपानी भाषेच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी किमान पात्रता म्हणून आठवी पास ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की जपानी भाषा प्राविण्य चाचणी (जेएलपीटी) च्या मूलभूत पातळी (एन 5) ला मान्यता देण्यासाठी उमेदवारांना जपानी भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल.

जेएलपीटी प्रमाणपत्राव्यतिरिक्त, उमेदवारांनी पीटीयू (पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी) प्रमाणपत्र पूर्ण केले पाहिजे. पंजाब कौशल्य विकास अभियानाचे संचालक राहुल तिवारी म्हणाले की, अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. ज्यात जपानी शिक्षक 37 प्रशिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.

मास्टर प्रशिक्षकांची साखळी तयार केली 

प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात जपानी भाषेच्या मास्टर प्रशिक्षकांची एक साखळी तयार केली आहे. ज्याअंतर्गत पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या प्रशिक्षकांना उच्च शिक्षण विभाग, पीएसडीएम, शालेय शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण विभाग यांच्यासह प्रशिक्षण दिले जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News