पावसाळ्यात जपा आरोग्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

पावसाळ्यात इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पाणी दूषित होण्याची शक्‍यता  अधिक असते. त्यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

जून महिना निम्मा संपला तरी अद्याप पावसाळा व्यवस्थित सुरू झाला नाही. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झालेला असला तरी मान्सूनच्या दाखल होण्याची प्रतीक्षाच आहे. मात्र, तो लवकरच राज्यात दाखल होऊन बरसण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यात आरोग्य जपण्याची सुरवात आतापासून करायला हवी. त्यामुळे, ऐनवेळी त्रास होणार नाही. आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्हाला यंदाच्या पावसाळ्याचा नक्कीच आनंद लुटता येईल.

पावसाळ्यात इतर कोणत्याही ऋतूपेक्षा पाणी दूषित होण्याची शक्‍यता  अधिक असते. त्यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे, किमान २० मिनिटे उकळून थंड केलेले पाणी प्यावे. ते शक्‍य नसल्यास फिल्टर केलेले पाणी प्यावे. 

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे, ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी या ऋतूत मिळणारी फळे खावीत. पावसाळ्याच्या सुरवातीला जांभळे बाजारात येतात. जांभळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने आवर्जून खावीत. विशेषत: मधुमेही रुग्णांसाठी ती विशेष उपयुक्त आहेत.

कोणत्याही कारणामुळे पावसात भिजल्यास ओले कपडे तसेच वापरू नका. अन्यथा, आजाराला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे, घरी आल्यावर ते तत्काळ बदलावेत. सोबत कपड्यांचा जास्तीचा जोड नेहमी ठेवल्यास कार्यालयात किंवा इतर ठिकाणीही ओले कपडे बदलता येईल.   

या ऋतूत भाज्यांवर दमट व पावसाळी वातावरणामुळे विषाणू तयार होतात. त्यामुळे, भाज्या तसेच फळेही स्वच्छ धुवावीत. भाज्या व्यवस्थित शिजवाव्यात. भाज्यातील विषाणू त्या गरम केल्याने नष्ट होतात.   

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. साचलेल्या पाण्यात डास अंडी घालत असल्याने त्यांची संख्या वाढते. त्यामुळे, घराच्या परिसरात व इतर ठिकाणीही पाणी साचू देऊ नये. गच्चीवरील जुने टायर, रिकाम्या बाटल्या आदींची कचऱ्यात विल्हेवाट लावावी. डासांपासून रक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News