रोमॅंटिक थ्रिलरमध्ये जान्हवी-ईशान पुन्हा एकत्र?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

धडकची जोडी पुन्हा आपला जलवा दाखवण्यासाठी येणार

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता ईशान खत्तर यांनी दिग्दर्शक करण जौहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता लवकरच हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळायला मिळणार आहेत.

करणच्या आगामी चित्रपटात हे दोघेही पुन्हा एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट एक रोमॅंटिक थ्रिलर असणार आहे. नाव गुलदस्त्यात असले, तरी चित्रपटाचे दिग्दर्शन बिजॉस नाम्बियार करणार असल्याची चर्चा आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News