जम्मू-काश्मीर हे अडवेंचर पर्यटनाचे केंद्र बनेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020
  • जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश केल्या नंतर आता येथील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पावले उचली जाऊ लागली आहेत.

मुंबई: जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश केल्या नंतर आता येथील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पावले उचली जाऊ लागली आहेत. जम्मू-काश्मीरचे गवर्नर सल्लागार के.के.शर्मा यांनी संबंधित माहिती दिली. 

त्यांनी सांगितले आहे की, येथे साहसी खेळ आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत, जेणेकरून जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळात स्थान मिळविण्याची संधी मिळेल. शर्मा म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशात स्थलांतर आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत जी साहसी खेळ आणि पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेनुसार काम सुरू केले आहे.  

'यामुळे जम्मू-काश्मीर पर्यटन प्रकारातील सर्वाधिक लोकप्रिय पर्याय ठरला जाईल. यामुळे पर्यटन उद्योगाला आर्थिक चालनाही मिळेल.' त्यांनी पुढे सांगितले की, 'जर असे झाले तर स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्याच वेळी युवकांना त्यांचे कौशल्य आणखी सुधारण्याची संधी मिळेल.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News