जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेसमधील विजय दुर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेसमधील विजय दुरापास्तच होत आहे. त्याला या स्पर्धेत सलग तिसऱ्या लढतीत अतिरिक्त डावात खेळाची वेळेशी सांगड घालण्यात अपयश आले आणि पराभवास सामोरे जावे लागले.

 मुंबई:  माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला लीजंडस्‌ ऑफ चेसमधील विजय दुरापास्तच होत आहे. त्याला या स्पर्धेत सलग तिसऱ्या लढतीत अतिरिक्त डावात खेळाची वेळेशी सांगड घालण्यात अपयश आले आणि पराभवास सामोरे जावे लागले.

आनंदला इयान नेपोमनिआश्‍तचि याच्याविरुद्ध 2-3 पराभवास सामोरे जावे लागले. पहिल्या डावात आनंदने प्रतिकूल परिस्थितीत बरोबरी साधली. दुसऱ्या डावात प्रभावी सुरुवातीचा फायदा आनंद घेऊ शकला नाही आणि त्याला तो गमवावा लागला. तिसऱ्या डावात सुरुवातीच्या कमकुवत बाजूतून सावरताना त्याने भक्कम बचाव केला. चौथ्या डावात त्याने प्रतिस्पर्ध्यास गाफील ठेवत केलेल्या चाली जबरदस्त होत्या. या डावात प्रतिस्पर्धी मोहऱ्यांचा मोबदला देत आनंदला ट्रॅपमध्ये पकडत आहे, असे वाटत होते; पण आनंदने याच जिंकलेल्या मोहऱ्यांद्वारे यश कसे मिळवता येते, हे दाखवले.

सामन्यातील चौथा डाव आनंदच्या टीकाकारांना उत्तर देणारा होता. आनंदचे आता वय झाले. तो आता पूर्वीसारखा धक्का देत नाही किंवा आगळ्या चाली करीत नाही, असे म्हणणाऱ्यांना आनंदने उत्तरच दिले. अजूनही तो तेवढाच धोकादायक आहे. ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष पटावर लढती झाल्या, तर कदाचित वेगळा निकाल लागेल, असे अनिश गिरीने सांगितले.

चारही डावानंतर बरोबरी असल्यास खेळल्या जाणाऱ्या आर्मगेदॉन डावात आनंदचा खेळ पुन्हा कमालीचा संथ होता. त्याला तांत्रिक प्रश्न सतावत असतील, असा अंदाज ग्रिशुकने व्यक्त केला. इयान नेपोमनिआश्‍तचि याचा खेळ पाहून आनंदला त्याच्या जागतिक वर्चस्वाच्या कालावधीची आठवण येत असावी, अशीही टिप्पणी ग्रिशुकने केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News