जगदीश्वराला आपल्या सोनकिरणांनी मढवण्यासाठी सज्ज व्हा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

जगदीश्वराला आपल्या सोनकिरणांनी अभिषेक घालून सूर्यही राजसदरेवर नजर रोखून बसला असेल....

सोन्याच्या परडीमध्ये काठोकाठ भरलेला भंडारा आसमंतात उधळण्याची प्रतीक्षा करत असेल....

ढोल संबळ ठेका धरून आपले बोल ऐकविण्यास आतुर असतील....
लांबलचक सासणकाठ्या बलदंड मावळी हातात नाचण्यासाठी सज्ज असतील....

ध्वजस्तंभाला फडकणारा भगवा दौलत ध्वज अजुन प्रखरतेने फडकत असेल....
पोतराजाचा चाबुक हवेला कापण्यासाठी सळसळत असेल....

पंचारती मधील ज्योत त्या तेजोवलयाला ओवाळायला अजुन प्रकाशमान होवून तेवत असेल....
शिर्काईच्या कळसाला स्पर्शुन येणारा वारा गडाच्या ताटांना बिलगत आलिंगन देत असेल....

दूधसागरात तयार होणारी लाट स्वराज्याचे गीत गात असेल सह्याद्रीच्या खांद्यावर उभे असलेले सगळे दुर्गरत्न दुर्गदुर्गेश्वराच्या रोखाने पाहत असतील आणि इतक्यात नगारखाण्यात उभा असलेला गारदी आपल्या पहाडी आवाजात अल्काब चढवत असेल की, आस्ते कदम.... आस्ते कदम... आस्ते कदम....

राजं काय रुबाबात येत असतील तेव्हा दरबारात...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News