लहानपणी आलेल्या गालगुंड(Mums) मुळे वृषणाच्या शुक्राणूनिर्मितीवर विपरित परिणाम होतो व शुक्राणूची वीर्यामधील कमतरता (Obstructive Azoospermia) होऊन बसते. त्याचप्रमाणे जांघेतील हर्नियाच्या शस्त्रक्रियेवेळी शुक्राणू वाहिनीस इजा पोचली तरी शुक्राणूवहन थांबते व अशा मुलांना मोठेपणी Obstructive ला सामोरे जावे लागते.
वृषणाची उत्पत्ती पोटात होते व आईच्या पोटात मूल असते तेव्हा साधारण ३२ आठवड्यांत ही वृषणे अंतिम ठिकाणी म्हणजे शरीराबाहेरील पिशवी (Scrotum) मध्ये पोचतात. परंतु काही अनाकलनीय कारणाने दोन्ही वृष्ण जर पोटातच राहिले तर ते शरीराच्या उष्ण तापमानात राहतात. जेणेकरून त्यामध्ये शुक्राणूची उत्पत्ती होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये लहानपणीच हे वृष्ण Scrotum ध्ये आणावयाची शस्त्रक्रिया करणे (Orchiopexy) अपरिहार्य आहे. तसेच दोन्ही वृष्णाला पिळ पडणे (Tortion) किंवा जंतू प्रादूर्भावामुळेसुद्धा शुक्राणूच्या प्रमाणावर (Epidedymo orchitis) विपरीत परिणाम झालेले आढळतात.
आता Azoospermia ध्ये शुक्राणू वाहिनीतील शुक्राणू इंजेक्शनद्वारे काढणे (Pesa), तसेच शुक्राणू वाहिनीमध्ये शुक्राणू जर मिळाले नाहीत, तर सरळ वृष्णातून तुकडा काढून तो सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे शुक्राणूचा शोध घेऊन त्यातील प्रजननक्षम शुक्राणू काढता येतात. अशक्यप्राय वाटणारी अपत्यप्राप्ती आज ICSI व PESA, TESA & MESE द्वारे आपल्या आवाक्यात आली आहे. हे तंत्रज्ञानाचं खरोखर यश आहे. तर शुक्राणू अपत्य असण्यापासून त्यात विविध दोष उपचाराअंती जर दूर होऊन अपत्यप्राप्ती झाली नसेल, तर ICSI / IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा शक्य झालेली आहे. हा उपचार थोडा खर्चिक आहे. परंतु ज्यांना Donor Sperm डोनरचे शुक्राणू वापरून गर्भधारणा करावयाची आहे त्यांना AID (Artificial Insemination Donor) द्वारे गर्भधारणा शक्य आहे. त्यासाठी IVF करण्याची गरज नाही. प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे मूल असावे वाटते. त्यासाठी आता हे तंत्रज्ञान सगळीकडे उपलब्ध झालेले आढळते.
IVF / ICSI करण्यासाठीही पुरुषामधील प्रमुख कारणे आपण पाहिली. स्त्रीला IVF / ICSI ची गरज आहे, हे जाणून घेण्यापूर्वी आपण PESA, TESA व MESA बद्दलची सखोल माहिती करून घेऊ. (Percutaneous Epididyamal Sperm aspiration) या सर्व प्रणालीची माहिती समजून घेण्यापूर्वी आपण पुरुष जननेंद्रियाची मूलभूत माहिती करून घेऊ. पुरुष जननेंद्रियामध्ये तीन वेगवेगळे घटक आहेत.
१) वृषण Testes जेथे शुक्राणूची, तसेच पुरुष संप्रेरकांची उत्पत्ती होते.
२) वहन करणारी यंत्रणा,
३) शिश्न म्हणजेच पुरुष बाह्य जननेंद्रिय वृषणापासून निघणाऱ्या असंख्य तलिकांचे पूंज म्हणजे Epidioymis या Epididymis एकत्र होऊन त्याचे शुक्राणू वाहिनी अर्थात तरी Vas deference ही शुक्राणू वाहिनी सूत्रनलिकेला प्रोस्टेट ग्रंथीजवळ मिळते.
वृषणातून येणाऱ्या शुक्राणूमध्ये Seminal Visicle, Prostat a Bulbourethral ग्रंथीचा स्त्राव मिसळतो व त्याचे संपूर्ण बियांमध्ये परिवर्तन होते. म्हणजेच थोडक्यात शरीराबाहेर लोंबत असलेल्या वृषणापासून निघलेली शुक्राणू वाहिनी Inguinal canal द्वारे पोटात येते व प्रोस्टेट ग्रंथीजवळ मूत्रनलिकेला मिळते. जेव्हा वीर्यामध्ये शुक्राणूचे प्रमाण, हालचाल कमी प्रमाणात आढळते किंवा Azoospermia ध्ये थेट शुक्राणू वाहिनीपूर्वी असलेल्या Epididimis शुक्राणू घेणे म्हणजे PESA यासाठी २६ गेंजच्या सुईचा (अतिसूक्ष्म) वापर करतात. इंजेक्शनच्या सहाय्याने अशा सुईद्वारे Epididimis द्रावण शोषले जाते व हे सर्व एका Petridish ध्ये घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने सक्षम शुक्राणू घेतले जातात व हे स्त्रीबीजामध्ये फलन क्रियेसाठी वापरतात.
पुढील क्रियांचा अभ्यास करण्यापूर्वी आपण वृषणाची रचना समजून घेऊ. वृषण हे शरीराबाहेर असल्याने त्याला इजा होणे संभवते. तर अशा छोट्या-मोठ्या धक्क्यांपासून त्याला नैसर्गिक संरक्षणासाठी एक जाडसर कवच असते Tunica व त्याच्या आत असंख्य नलिकेने व्यापलेले शोस्त्रिका पद्धतीचे जाळे असते.
या नलिकेमध्ये शुक्राणूची निर्मिती व वाढ होत असते व या नलिका Epididimis ध्ये शुक्राणू वहन करतात. तर वरून गोटीच्या आकाराचे जरी दिसत असले तरी Seminiferous tubules सूक्ष्म नलिकेनी गच्च भरलेले वृषण वयाच्या दहाव्या वर्षांपासून अव्याहतपणे शुक्राणूनिर्मिती करीत असेत.