भारतात येणाऱ्या इवांका ट्रम्प यांचा असा आहे भारताशी संबंधी

यिनबझ टीम
Sunday, 23 February 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या भेटीसाठी संपूर्ण भारत तयारीमध्ये लागला आहे. पाहुणचार हा जगावेगळा असला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अजून एक पाहुणा भारतात येत आहे, ती म्हणजे त्यांची मुलगी इवांकासुद्धा भारत दौर्‍यावर येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येत आहेत. या भेटीसाठी संपूर्ण भारत तयारीमध्ये लागला आहे. पाहुणचार हा जगावेगळा असला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अजून एक पाहुणा भारतात येत आहे, ती म्हणजे त्यांची मुलगी इवांकासुद्धा भारत दौर्‍यावर येत आहे.

यापूर्वीही इवांका भारत दौर्‍यावर आली होती. हैदराबाद येथे आयोजित ग्लोबल एंटरप्रेन्योरशीप समिट (जीईएस) मध्ये सहभागी होण्यासाठी ती 28 नोव्हेंबर 2017 रोजी भारत दौऱ्यावर आली होती. अशाच इवांका ट्रम्प हिच्याबद्दल आपण खास जाणून घेणार आहोत...

39 वर्षीय इवांका ट्रम्प ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प यांची मुलगी आहे. इवांकाचा जन्म 1981 मध्ये झाला होता. त्यांची आई एक अमेरिकन मॉडेल होती. असे म्हटले जाते की ट्रम्प यांनी इवानाला घटस्फोट दिला तेव्हा इव्हांका अवघ्या 10 वर्षाची होती.

इवांका ट्रम्प यांनी बिजनस एग्जिक्युटिव, मॉडेल, समाजसेवक यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जेव्हा मॉडेलिंगच्या जगात इवांका यांनी करिअर सुरू केले होते, तेव्हा इवांका साधारण 15 वर्षाची होती.

2009 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जेरेड कुशनरशी लग्न केले. जेरेड एक प्रसिद्ध प्रॉपर्टी डिवेलपर आहेत. इवांका आणि कुशनर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान इवांकाची विशेष भूमिका होती. महिला मतदारांना आकर्षित करण्यात इवांका यांचेही मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते.

2017 मध्ये, अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त प्रयत्नात ग्लोबल एंटरप्रेन्योर समिट (जीईएस) हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आले होते. यात इवांका ट्रम्प यांच्यासह 1,500 अमेरिकन बिझिनेस प्रतिनिधी उपस्थित होते.

इवांकाने 2005 मध्ये तिच्या दोन भावासोबत वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतला. इवांका यांच्याकडे ट्रम्प संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष (ईव्हीपी) देखील होते. तथापि, ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होताच इवांकानेही आपली भूमिका सोडून वडिलांची सल्लागार म्हणून काम करण्यास सुरवात केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News