आस पावसाची...

उज्वला सुधीर
Thursday, 13 June 2019

वार्‍यावरती हा ओलासा,
पदर कुणाचा झुळझुळतो.

अजून नाही आला पाऊस, 
अजून नाही ढग बरसले...
विरहाच्या या काठावरती
बघ मातीचे डोळे ओले....

वार्‍यावरती हा ओलासा,
पदर कुणाचा झुळझुळतो.
सावळासा नभ वेडा रे
कुणा भेटण्या तळमळतो...?

ऐकू येतेय ही कुणाच्या 
हृदयामधली आर्त विराणी
गहिवरले बघ अंबर सारे
नयनी दाटले त्याच्या पाणी....

क्षितिजावरती उमटून आल्या
पावसाच्या चाहूलखुणा....
मातीचा हा हंबर ऐकून 
ढगास आता फुटेल पान्हा...!

ओल्या पाऊसस्वप्नानेही
अंगी उठला गोड शहारा
तहानलेल्या धरणीवरती
बरसतील आता अमृतधारा....!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News