तुम्ही मे महिन्यात सुट्टी घेताय ना? मग इट्‌स Family टाईम!

शिवानी वकील
Wednesday, 15 May 2019

आपण शाळेत असताना निबंध लिहायचो. त्यात ‘माय मदर’, ‘माय फादर’ आणि ‘My Family’ हे निबंध हटकून असायचे, आठवतंय? आणि आपणही बरेचदा अगदी टिपिकल निबंध लिहायचो. My Family म्हटलं की I have a beautiful family, warm family, happy family, caring family असं काय-काय लिहायचो.

Hello फ्रेंड्‌स!
आपण शाळेत असताना निबंध लिहायचो. त्यात ‘माय मदर’, ‘माय फादर’ आणि ‘My Family’ हे निबंध हटकून असायचे, आठवतंय? आणि आपणही बरेचदा अगदी टिपिकल निबंध लिहायचो. My Family म्हटलं की I have a beautiful family, warm family, happy family, caring family असं काय-काय लिहायचो. आणि काही वेळा तर चक्क आपला family tree सुद्धा काढायचो. आणि drawing ध्येही My Family हा लाडका विषय असायचा. आई-बाबा, आजी-आजोबा, एक-दोन भावंडे असं family चं चित्र असायचं. प्रत्यक्षात मोठं कुटुंब नसलं, तरी या चित्रात मात्र सगळेजण नक्की असायचे. 

आपल्याला कळायला लागल्यापासून आपण family म्हणजेच आपलं कुटुंब किती गृहित धरत असतो. आपलं हक्काचं ठिकाण असतं ते. काही वेळा तर आपला कोषसुद्धा. मग शिक्षणाच्या निमित्तानं घराबाहेर पडून होस्टेलला गेल्यावर या घराची आणि त्यातल्या कुटुंबाची, आपल्या माणसांची पहिल्यांदाच किंमत कळू लागते. आपल्या येण्याची वाट पाहणारी, आपल्या आवडीनिवडी सांभाळणारी आई, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्यांच्यावर भिस्त असते ते बाबा, आपल्यासाठी आठवणीनं अनेक गोष्टी करणारे आजी-आजोबा, कधी आपल्याशी भांडणारे, पण आपण घराबाहेर जाणार या कल्पनेनं रडवेले झालेले बहीण/भाऊ... या लोकांशिवाय राहण्याची कल्पनाच भयंकर असते. आणि तेही नव्या वातावरणात, नव्या लोकांबरोबर, नव्या रुटीनची सवय करून घेताना...

आपलं कुटुंब हा आपला आधार असतो, आपली शक्ती असते. तिथं आपण कसं निर्धास्त असतो. तिथं आपल्याला कुठल्या औपचारिकता किंवा व्यवहार पाळण्याची गरज नसते. आपण तिथं मोकळे होतो, मजेत असतो आणि मायेच्या वातावरणात एन्जॉय करीत असतो. पण, आता आपण मोठे झालोय. कुटुंबाच्या या चौकटीत आपण आता आपलीही जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. म्हणजेच आता आपण ‘देण्या’ची वेळ आलीय.

घरातल्या कामांत सहभाग असेल, घरच्या अडचणी समजून घेण्याचा विषय असेल, आर्थिक हातभार असेल, किंवा आणखी काही... कुटुंबामध्ये आपणही आपला वाटा उचलूया. आपले विश्‍व, आपली क्षेत्रे कितीही वेगळी असली, तरी घरच्यांसाठी वेळ देऊया... आणि आपल्या कुटुंबाचा आपणही आधार बनायचा प्रयत्न करूया.
             

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News