आता इंटरनेटवर पैसे कमावणं झालं सोपं; पाहा काय आहेत पर्याय...!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019
  • आज अनेकजण यामध्ये पैसे कमविण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत.
  • इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमविण्याचे पर्याय आहे, जाणून घ्या.. 

आज इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला पहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे त्याचा विविध गोष्टींसाठी वापर होऊ लागला आहे. यामुळे अनेक कामे सोयीस्कर आणि जलद गतीने होत आहेत. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून आपण पैसे देखील कमावू शकतो. आज अनेकजण यामध्ये पैसे कमविण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमविण्याचे पर्याय आहे, जाणून घ्या.. 

फ्रिलान्सर :
एखाद्या कंपनीसाठी किंवा ब्रँडसाठी तुम्ही रिव्हीह्यू लिहीत असाल, आणि जर तो समोरील कंपनीला आवडला. तर तुम्हाला रिव्हीह्यू लिहिण्यासाठी कंपनी पैसे देऊ शकते. त्यासोबतच काही प्रोडक्ट्स देखील मोफत देऊ शकते. त्यासोबतच तुमची फोटोग्राफी चांगली असेल तर तुमच्या चांगल्या फोटोसाठी कंपनी तुम्हला पैसे देऊन तुमच्याकडून फोटो देखील घेऊ शकते. 

अफिलिएट मार्केटिंग :
हा एक बिझनेस फंडा आहे. अतिशय सहज सोपा असा हा पैसे कमविण्याचा मार्ग आहे. तुमच्या क्लाईंटला किंवा तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला सोशली प्रमोट करायचे असते. या प्रमोशनमधून तुम्ही पैसे कमावू शकता. यासाठी तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची किंवा भटकंती करण्याची गरज नाही. 

युटूबर :
हा तरुणांमध्ये आवडीचा आणि झपाट्याने वाढणारा बिझनेस आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजकाल प्रत्येकजण युट्युबर बनण्याच्या तयारीत असतो. वेगवेगळे विषय घेऊन समोर आल्यास या गोष्टीला देखील सोशल मीडियात मोठा वाव आहे. तुमचा विषय वेगळा हवा, तुम्हाला त्याला योग्यप्रकारे प्रमोट करता येणे गरजेचे आहे. तसे झाल्यास लाखोंच्या घरात लोकं तुम्हाला फॉलो करतील, हे नक्की..!

ई-बुक लिहिणे 
जर तुम्हाला लिहिण्याची सवय आणि आवड असेल तर तुम्ही या माध्यमातून पैसे कमावू शकता. आज जगातील अनेक लेखक या माध्यमातून पैसे कमावत आहेत. इंटरनेटमुळे अनेक पुस्तके ही ऑनलाईन उपलब्ध करण्यात येतात. तुमची लिखाणाची शैली योग्य असेल तर तुम्हाला केवळ तुमच्या बुकचे मार्केटिंग सोशल मीडियावर करावे  लागते. सध्या सोशल मीडियामुळे हे आणखी सोप्प झालं आहे. 

ब्लॉग 
अनेकजणांना ब्लॉग लिहिण्याची सवय असते.  मात्र या सवयीतून तुम्ही पैसे मिळवू शकता. तुमचा ब्लॉग लोकांना आवडेल अशा पद्धतीचा असेल तर नक्कीच लोकांपर्यन्त तो पोहचू शकतो. अशापद्धतीने तुम्ही तुमचं वेगळं नेटवर्क निर्माण करू शकता. यामुळे जाहिरातदार देखील तुम्हाला जाहिराती देण्यास सुरु करतील आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतील. 

ऑनलाईन ट्युटोरिअल 
तुम्हाला शिकविण्याची आवड असेल तर ही आवड तुम्हाला पैसे कमावून देऊ शकते.  ऑनलाईन ट्युटोरिअल करून तुम्ही शिकवू शकता. यामध्ये शाळेचा अभ्यासक्रम, ब्युटी ट्युटोरिअल, डान्स, फिटनेस तसेच वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या ट्युटोरिअलचा समावेश असू शकतो. 

ई-मेल मार्केटिंग 
ई-मेल मार्केटिंग हा बिझनेसचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. यासाठी सखोल ज्ञान आणि मार्केटिंग स्किल्स हव्यात. या माध्यमातून नेटवर्क उभारून तुम्ही पैसे कमावू शकता. 

हे आणि यासारखे अनेक पर्याय आहेत, तुम्ही सोशल मीडियावर वेळ घालवत असाल, तर हे पर्याय नक्की करून पाहू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News