प्रवेश, नोकऱ्या कमी असलेले आयटीआय कोर्सेस बंद होणार - नवाब मलिक

अतूल पाटील, औरंगाबाद
Friday, 31 January 2020
  • नवाब मलिक यांची सहसंचालक कार्यालयास भेट
  • आयटीआयच्या ज्या कोर्सला प्रवेश, रोजगाराच्या संधी कमी आहेत. ते कोर्स बंद करण्याच्या सूचना अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केल्या. उद्योग, रोजगार, स्वयंरोजगारात ज्या कोर्सला मागणी आहे, तेच कोर्स सुरु करण्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद : आयटीआयच्या ज्या कोर्सला प्रवेश, रोजगाराच्या संधी कमी आहेत. ते कोर्स बंद करण्याच्या सूचना अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केल्या. उद्योग, रोजगार, स्वयंरोजगारात ज्या कोर्सला मागणी आहे, तेच कोर्स सुरु करण्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणच्या सहसंचालक कार्यालयात त्यांनी गुरुवारी (ता. 30) भेट दिली. यावेळी त्यांनी आयटीआयचे सहसंचालक तसेच सर्व प्राचार्यांशी संवाद साधला. सहसंचालक सतीश सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. रोजगार निर्मितीत वाढ करावी, अप्रेंटिसमध्ये वाढ करण्यात यावी, अशा सूचना मलिक यांनी केल्या.

आयटीआयच्या विविध कोर्सला ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यात रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांची आहे. त्यानुसार उद्योग क्षेत्राला आवश्‍यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी त्या प्रकारचे कौशल्यही तरुणांमध्ये असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय कठोर पावले उचलत आहे. यासाठी तज्ज्ञांचे आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घ्यावे. अशा सूचना नवाब मलिक यांनी केल्या.हेही वाचा...
CBI सोबत तुम्हीही करू शकता इंटर्नशिप, पदवीधारकांना प्रथम संधी

एमआयडीसी परिसरात मुला-मुलींसाठीचे नवीन वसतीगृह उभारण्याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. यावेळी नवाब मलिक यांच्या हस्ते नुकताच शौर्य पुरस्कार मिळालेल्या आकाश खिल्लारेचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी श्री. सूर्यवंशी, सर्व कोर्सचे प्रमुख, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा...
UPSC INTERVIEW मित्र दहशतवादी असेल तर त्याला परत कसं आणाल?

हे कोर्स होणार बंद
औरंगाबाद विभागात 79 कोर्स आहेत. यापैकी ड्रेस मेकिंग, कटिंग स्विंग, बेकरी ऍण्ड कन्फेशन या कोर्सला विद्यार्थी मिळत नाहीत. मिळाले तर, त्यांना सरकारी नोकऱ्या तसेच अप्रेंटिस करता येत नाही. या कोर्सला ग्रामीण भागात विद्यार्थीच मिळत नाहीत. असे कोर्स येत्या काळात बंद होऊ शकतात. अशी माहिती सहसंचालक सतीश सुर्यवंशी यांनी दिली.

शिकाऊ मानधनात वाढ
एससी, एसटी आणि इतर सर्व मुलांसाठी देण्यात येणाऱ्या शिकाऊ मानधनात वाढ करण्यात येणार आहे. प्रस्तावित वाढ लवकरच करण्यात येईल. असे आश्‍वासन नवाब मलिक यांनी दिले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News