अबब! चक्क 85 लाखांचं केळं, एका झटक्यात खालं आणि नंतर जे झालं ते एकदा पाहाच

यिनबझ टीम
Monday, 9 December 2019

आता एका केळ्याची किंमत 85 लाख असते का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे सहाजिकच आहे, पण त्यामागची कहानी वाचाल तर सगळा प्रकार तुम्हाला समजून जाईल.

अमेरिका - अमेरिकेच्या मियामी या भागात सध्या एक बेसल नावाचं कला प्रदर्शन भरलं आहे. या कला प्रदर्शनात जगातील सर्वोत्तम कलाकारी सादर केली जात असते. येथे असलेल्या कलाकृतींची किंमतही तितकीच असते. हे सगळं जरी ठिक असलं तरी अजून एक मोठा कारभार समोर आला आहे, तो म्हणजे या कला प्रदर्शनात एक केळदेखील प्रदर्शनासाठी ठेवलं आहे. ज्याची किंमत तब्बल 85 लाख आहे.

आता एका केळ्याची किंमत 85 लाख असते का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे सहाजिकच आहे, पण त्यामागची कहानी वाचाल तर सगळा प्रकार तुम्हाला समजून जाईल.

या केळ्याला एकेकाळी फ्रान्सच्या एका महिलेने 1 लाख 20 हजार डॉलरने विकत घेतले होते. म्हणजेच भारतीय रुपयानुसार 85 लाख रुपये त्या केळ्याची किंमत होते. याच केळ्याला त्या महिलेने या प्रदर्शनात मांडले. आता अजब गोष्ट ही आहे की, ही सगळी स्टोरी माहिती असतानादेखील कोण या केळ्याला जबरदस्तीने भूख लागले म्हणून खाण्याची तसदी घेईल का?

हो तर ही रिस्क एका तिथल्या कलाकाराने घेतली आहे. अमेरिकन कलाकार डेविड डटुना यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता भूख लागले म्हणून ते केळं खाऊन टाकलं. म्हणजेच 85 लाखांचं केळं एका झटक्यात खाल्लं आणि तोच कलाकार स्वत:ला भुक्कड कलाकार म्हणून म्हणवून घेत होता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News