परीक्षा न देता पदवी देणे गैरच!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • कोव्हिड-१९ च्या साथीमध्ये अंतिम वर्ष परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दिलेला नकार बेकायदा असल्याचा दावा पुन्हा एकदा विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
  • परीक्षा न घेता पदवी बहाल करणे गैर असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे अतोनात नुकसान होणार आहेअसे मतही यूजीसीने मांडले.

मुंबई :- कोव्हिड-१९ च्या साथीमध्ये अंतिम वर्ष परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने दिलेला नकार बेकायदा असल्याचा दावा पुन्हा एकदा विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. परीक्षा न घेता पदवी बहाल करणे गैर असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे अतोनात नुकसान होणार आहेअसे मतही यूजीसीने मांडले. यूजीसीचे शिक्षणाधिकारी निखिल कुमार यांनी हे प्रतिज्ञापत्र गुरुवारी न्यायालयात दाखल केले.

यूजीसीने सप्टेंबर अखेरपर्यंत अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे आदेश सर्व विद्यापीठांना दिले आहेतमात्र महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने या निर्णयाला विरोध करत परीक्षाच रद्द केल्या आहेत. यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवा सेनेसह अनेक विद्यार्थ्यांनी याचिका केल्या आहेत. शुक्रवारी या प्रकरणावर न्यायालय सुनावणी घेणार आहे.

महाराष्ट्र सरकारने आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा रद्द केल्या आहेतमात्र संबंधित विभाग कायदेशीर तरतुदीनुसार नसून त्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समिती असणे आवश्‍यक आहेअसे मत यूजीसीने दिले. यूजीसीचे निर्णय राज्य सरकारांना बांधील असून त्यावर अंमलबजावणी व्हावीतसेच पुरेसा अवधी विद्यापीठ संस्थांना असल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची गरज नाहीअसा दावा यूजीसीने केला आहे.

...तर शैक्षणिक पत धुळीला

परीक्षा न घेता पदवी देणे म्हणजे आपली शैक्षणिक पत धुळीला मिळवणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्‍यात घालण्यासारखे आहे. तसेच परीक्षा वेळेत घेतल्या नाहीततर पुढील वेळापत्रकही विस्कळित होऊ शकतेअसे यूजीसीने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News