ताहिरला या भूमिकेत पाहणे रंजक ठरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 January 2020

ताहिर राज गावस्करांच्या भूमिकेत 

अभिनेता ताहिर राज भसीनने ‘मर्दानी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

अभिनेता ताहिर राज भसीनने  ‘फोर्स २’, ‘मंटो’, ‘चिछोरे’ या चित्रपटात झळकला. लवकरच तो ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हा चित्रपट १९८३ मधील क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित आहे. या चित्रपटात तो क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणार असून त्याचे या भूमिकेतील पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह असून तो क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांचे आहे. ताहिरला या भूमिकेत पाहणे रंजक ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News