प्रत्यक्षात हवं होतं

रवि मेषराम
Friday, 10 May 2019

चिमणीच्या आवाजात
एक वाक्य बोलली,
माफ कर मला,
माझ्याकडूनच थोडी चूकी झाली...

आज अचानक भलतंच घडलं,
मोबाईलच्या स्क्रिनवर पुन्हा
तिचं नाव दिसलं...

मागचं सगळं विसरून,
अगदी मनमोकळं बोलली,
नेहमीसारखीच हसली अन्
हसता हसताच थांबली...

चिमणीच्या आवाजात
एक वाक्य बोलली,
माफ कर मला,
माझ्याकडूनच थोडी चूकी झाली...

तुझ्याचमुळे मला,
खऱ्या मैत्रीची किंमत कळली,
काही वेळानंतर मलाही कळलं,
प्रत्यक्षात मला हवं होतं ते,
फक्त स्वप्नातच घडलं...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News