शरद पवारांनी सार्वजनिक रित्या पार्थला फटकारणे योग्य आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • 'पार्थ हा अपरिपक्कव आहे त्याच्या मताला कवडीचीही किंमत नाही' असे उत्तर पवारांनी पत्रकारांना दिले.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वष्ट वक्तेपणा आणि कठोर शिस्तीसाठी ओळखले जातात. कुटुंबात आजही पवारांचा शब्द हा शेवटचा मानला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना कडक शिस्त लागवी. या शिस्तीचे पालन वैयक्तिक जीवनात पवार करतात. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी बुधवारी केली होती. यावर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला? 'पार्थ हा अपरिपक्कव आहे त्याच्या मताला कवडीचीही किंमत नाही' असे उत्तर पवारांनी पत्रकारांना दिले. शरद पवारांनी सार्वजनीक रित्या पार्थला फटकारणे योग्य आहे का? या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मला तर हा राजकीय स्टंट वाटतो. कधीकधी घरातील व्यक्तीला सार्वजनिकरित्या फटकरून नक्की सिद्ध काय करायचं होते? मग अजित पवारांनी शपथ घेतली त्यावेळी तर अशी वक्तव्य केली नाही. त्यावेळी सगळं घरात बसून प्रश्न सोडवला. पार्थ पवारला हिंदू मतांचा आधार मिळावा म्हणून सुद्धा असे केले असावे. गेल्या काही दिवसांतील मंदिर बद्दल निगेटिव्ह वक्तव्यामुळे जी हिंदू मते दुखावली असतील तर त्यांना पार्थ नावाचा आधार मिळावा. शेवटी घरातील इतके व्यक्ती राजकारणात आहेत तर प्रत्येकाने प्रत्येक धर्माची बाजू मांडली तर आपोआप सगळीकडे समान वजन राहू शकते. हे सर्व माझे राजकीय मत आहे. शेवटी पवार साहेबांनी का फटकारले याचे उत्तर त्यांना आणि पार्थ यांनाच माहित. यावर पार्थ आणि आजित दादांची प्रतिक्रया यायची आहे. ही शक्यतो जय श्री राम असे म्हणतं येणार असेल.
- शंभुराज पाटील.

मोजक्या शब्दात सांगायचे तर हे सगळं राजकीय स्टंटबाजी आहे. आपण किती चर्चेत राहतो. आणि आपली एक प्रतिमा तयार करण्याचा हा प्रयत्न. एकंदरीत ह्या बद्दल सर्वसामान्य जनतेचा काहीही संबध घडत नाही. त्यामुळे आपण आपण अनेक विषयावर विचार मंथन करू शकु. कारण कोणी कितीही काही मनल तरी प्रत्येक नेत्याचा एक राजकीय वारस असतो आणि त्याची सोय तो करतोच. आणि प्रामाणिक कार्यकर्ता हा कार्यकर्ता च राहतो.
- व्यंकटेश नार्लावार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News