पाळीच्या कालावधीत तरुणीला वेगळं ठेवणे योग्य आहे का? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
ग्रामीण भागात आजही तरुणीला पाळीच्या कालावधीत पाच दिवस वेगळे बसवले जातात. देवाचे दर्शन, स्वंयपाक यापासून दुर ठेवले जाते त्यामुळे तरुणींना माणसीक त्रास सहन करावा लागतो.

मुंबई : पाळी ही नैसर्गिक प्रक्रीया आहे. दर महिन्यातून एकदा सर्व महिलांना येत असते, मात्र पाळीला सध्या अंधश्रद्धेचे रुप देण्यात आले. ग्रामीण भागात आजही तरुणीला पाळीच्या कालावधीत पाच दिवस वेगळे बसवले जातात. देवाचे दर्शन, स्वंयपाक यापासून दुर ठेवले जाते त्यामुळे तरुणींना माणसीक त्रास सहन करावा लागतो. पाळीच्या कालावधीत तरुणीला वेगळं ठेवणे योग्य आहे का? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी गौरीचे आगमन झाले आहे. स्त्रिया मोठ्या उत्साहाने गौरीची पूजा, सजावट करत असतात. मग घरात एखाद्या स्त्रीला जर पाळी आली तर त्या स्त्रीला देवीजवळ येऊ दिल्या जात नाही. कारण की हा विटाळ समजल्या जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या अंधश्रद्धावादी परंपरा शिकवल्या त्याच तंतोतंत पालन आजही केल्या जाते.  मुलीला वयाच्या 13व्या वर्ष्यानंतर शरीरामध्ये बदल होत असतात. पाळी येणे हे नैसर्गिक आहे. आणि याचा गौरीशी काहीही संबंध नाही.
- कृष्णा गाडेकर

रीती परंपरा ह्या चांगल्या उद्देशाने बनविण्यात आल्या होत्या. पण काळाच्या ओघात त्या चुकीच्या रूप घेतात. पाळीच्या काळात महिलांच शरीर स्वत:ला स्वच्छ करत.  त्यात त्यांची energy खर्च होते. अशात त्यांनी अराम करण अपेक्षित असतं आणि काहिही काम करू नये. याला पूजा अर्चनाशी जोडणे चुकीचं आहे.
- प्रतिक भालेराव
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News